bhor river 
पुणे

आत्महत्येसाठी नदीत उडी मारलेल्या महिलेला पुराच्या पाण्यामुळे जीवदान 

विजय जाधव

भोर (पुणे) : पाण्यामुळे माणसांचा जीव जातो, परंतु नीरा नदीतील वाहत्या पाण्यामुळे एका महिलेला जीवदान मिळाल्याची घटना गुरुवारी (ता. ६) सकाळी भोर शहरात घडली. 

गुरुवारी सकाळी नऊच्या दरम्यान शहराच्या एसटी स्टँडजवळील प्रवेशव्दाराच्या पुलावरून एका महिलेने नीरा नदीत उडी मारली. परंतु, दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामळे नदीमधील पाणी जोरात वाहत आहे. त्यामुळे ती महिला पाण्यात पडल्याबरोबर पाण्यासोबत वाहून जाऊ लागली. पुलाच्या भिंतीला धडकून ती महिला बाजूच्या झुडूपात अडकली. तिच्या हातात झुडूपाची एक फांदी आली. तीने ती धरून ठेवली. 

या ठिकाणी सकाळी- सकाळी रहदारी असल्याने ही गोष्ट नागरिकांच्या लगेच लक्षात आली. तोपर्यंत दत्ता कुऱ्हाडे व आकाश भोसले यांनी नदीत उड्या मारल्या आणि त्या महिलेला वाचविण्यासाठी वाहत्या पाण्यात गेले. तोपर्यंत सह्याद्री रेस्क्यू फोर्सचे सचिन देशमुख हे दोर व इतर साहित्यासह घटनास्थळी हजर झाले. त्यांनी दोराच्या मदतीने महिलेस सुखरुप बाहेर काढले. तोपर्यंत बघ्यांची गर्दी जमली होती. अर्ध्या तासानंतर बाहेर आल्यावर संबंधित महिलेने स्वतःहून पाण्यात उडी मारल्याचे सांगितले आणि पायीच घरी चालत गेली. काही वेळानंतर ती दवाखान्यामध्ये उपचारासाठी गेली. 

दरम्यान, तीन दिवसांपूर्वी नीरा नदी कोरडी होती. परंतु, मागील दोन दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली असती, तर कदाचित महिलेला आपला जीव गमवावा लागला असता. कारण, सुमारे दीडशे फूट उंचीवरून नदीतील खडकावर पडल्यावर जिवंत राहणे अशक्य आहे. संबंधित महिला कोण आहे आणि तिने नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न का केला? हे प्रश्न अनुत्तरीतच आहेत. याबाबत पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार किंवा खबर दाखल झाली नाही. परंतु, भोर शहरात मात्र दिवसभर वाहत्या पाण्यामुळे महिला वाचल्याची चर्चा सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : मॉन्सूनच्या परतीला सुरुवात ! राज्यात आज विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज; २१ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Spinach Oats Tikki: हेल्दी नाश्त्यासाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांत बनवा हेल्दी अन् कुरकुरीत पालक-ओट्सची टिक्की

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

SCROLL FOR NEXT