पुणे

पोलिसांच्या तत्परतेने तरुणाला जीवदान

सकाळवृत्तसेवा

पुणे - रविवारी रात्री अकराची वेळ...पोलिस नियंत्रण कक्षातून हडपसर पोलिस ठाण्याच्या बीट मार्शलना एका तरुणाने गळफास घेतल्याबाबत कॉल येतो...पोलिस घटनास्थळी पोचल्यानंतर पत्नीबरोबर झालेल्या भांडणामुळे एका व्यक्तीने काही मिनिटांपूर्वीच गळफास घेतल्याचे दिसते. पोलिस तत्काळ त्या तरुणाला १०८ रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पोचवितात. अखेर पोलिसांच्या प्रयत्नामुळे एका तरुणाचे प्राण वाचण्यास मदत होते. 

ही घटना हडपसरमधील भगवती हाउसेस परिसरात काल (ता. १५) रात्री घडली. हडपसर पोलिस ठाण्याचे बीट मार्शल विठ्ठल चिपाडे व युवराज कांबळे हे रविवारी रात्रगस्तीवर होते. त्या वेळी पोलिस नियंत्रण कक्षातून वॉकीटॉकीद्वारे कौटुंबिक भांडणातून एका व्यक्तीने गळफास घेतल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर दोघेही काही मिनिटांतच हडपसरमधील भगवती हाउसेस येथे दाखल झाले. तेथे ३२ वर्षांच्या एका तरुणाने गळफास घेतला होता. चिपाडे व कांबळे यांनी आतून बंद असलेला दरवाजा धक्के मारून उघडला. त्या दोघांनी तरुणाच्या गळ्यातील फास चाकूने कापला. त्याचवेळी १०८ रुग्णवाहिकेस दूरध्वनी करून बोलावून घेतले. रुग्णवाहिका वेळेत पोचल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयामध्ये दाखल केल्यावर डॉक्‍टरांनी त्याच्यावर उपचार केले. थोड्या वेळाने तो तरुण शुद्धीवर आला. त्यामुळे त्यांचे कुटुंबीयही सुखावले. 

आम्ही घटनास्थळी गेलो, त्या वेळी बघ्यांच्या गर्दीतील काहीजण मोबाईलवर छायाचित्रे काढण्यात, तर काही मोबाईलवर चित्रीकरण करण्यात गुंग असल्याचे दिसले; परंतु गळफास घेणाऱ्या व्यक्तीचा जीव वाचविण्यासाठी कोणीच पुढे येत नव्हते. गळफास घेऊन काही मिनिटेच झाली होती. त्यामुळे आम्ही त्याला लगेच दवाखान्यात हलविल्याने त्याचा जीव वाचला.
-विठ्ठल चिपाडे,  पोलिस कर्मचारी, हडपसर. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local : गर्दुल्यांकडून मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! दिवसाढवळ्या घडला धक्कादायक प्रकार

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : ट्रॅविस हेडने डाव सावरला; अर्धशतक ठोकत संघाला नेलं शतकाच्या जवळ

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT