Local administration should decide to close schools from March 1 said Varsha Gaikwad  
पुणे

1 मार्चपासून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घ्यावा : वर्षा गायकवाड

सकाळन्यूजनेटवर्क

पुणे :‘‘राज्यातील काही जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. ही परिस्थिती पाहता स्थानिक प्रशासनाने जिल्ह्यातील स्थितीनुसार येत्या सोमवारपासून (ता.१) आवश्यकता भासल्यास आणि परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत काही काळ शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा,’’ असा आदेश शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी गुरूवारी दिला आहे.


कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने मुंबई, पुणे यांसह अनेक शहरांमधील शाळा सध्या बंद आहेत. त्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभाग आणि अन्य अधिकाऱ्यांच्या उच्च पातळीवर वारंवार बैठका होत आहेत.

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण - पुणे पोलिसांची भूमिका संशयास्पद, तपास काढून घ्या 

दरम्यान एक मार्चपासून शाळा बंद ठेवण्याच्या निर्णय घेण्याची जबाबदारी गायकवाड यांनी स्थानिक प्रशासनावर सोपवली आहे. त्या म्हणाल्या,‘‘विद्यार्थी आणि शिक्षक यांची सुरक्षितता याला सर्वोच्च प्राधान्य आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आढळून आलेल्या शाळांमध्ये आवश्यक ती स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही करण्याबाबत स्थानिक प्रशासनास सुचना देण्यात आल्या आहेत. काही जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थी व शिक्षकांत कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता समाजकल्याण मंत्री, आदिवासी विकास मंत्री यांच्याशी चर्चा करण्यात येत आहे.’’ याबाबत राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकारी यांच्याकडून जिल्हानिहाय आढावा घेण्यात येत असल्याचेही गायकवाड यांनी ‘ट्विटर’द्वारे माहिती दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: आता ३० मिनिटांच्या प्रवासाला फक्त १० मिनिटे लागणार! मुंबईतील 'हा' महत्त्वाचा उड्डाणपूल पूर्ण होणार; कधी आणि कोणता?

Gold Bag Returned Kolhapur Honesty : कोल्हापुरी लै भारी! दहा तोळे सोन्याची बॅग परत; केएमटी चालक-वाहकाच्या प्रामाणिकपणाचा आदर्श

Video : "माझ्या कॅरेक्टरवर जायचं नाही" घरच्यांविरोधात तन्वीचा चढला पारा ; प्रोमो पाहून प्रेक्षकांनी मांडली बाजू

अजितदादांच्या अपघातानंतर राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर; सरकारी विमानं अन् हेलिकॉप्टर्ससंदर्भात घेतला महत्त्वाचा निर्णय; थेट जीआरच काढला!

Mharashtra Politics : छगन भुजबळ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; राजकीय हालचालींना वेग

SCROLL FOR NEXT