Potraj Deepak Pawar Sakal
पुणे

पोटाच्या खळगीवर लॉकडाउनचा 'आसूड'

लॅाकडाउनने अनेकांचे जगणे विस्कळीत केले. रोज मागायला जायचे अन् घरी काही तरी आणायचे अशा वर्गाचे तर फारच हाल झाले. सगळच बंद तर मागायला कुठं जाणार. खायला तर रोज लागतय.

रमेश वत्रे

केडगाव - पोटाचा अन् लॅाकडाउनचा (Lockdown) काय संबंध. पोटाला कुठलं आलय लॅाकडाउन. त्याचं खळगं तर रोज भरावाच लागतंय. उसनं-पासनं करून दिस काढलं, अशी व्यथा केडगाव येथील पोतराज (Potraj) कृष्णा डोलारे (Krishna Dolare) सांगत होते. (Lockdown Potraj Aasud Krishna Dolare Life)

लॅाकडाउनने अनेकांचे जगणे विस्कळीत केले. रोज मागायला जायचे अन् घरी काही तरी आणायचे अशा वर्गाचे तर फारच हाल झाले. सगळच बंद तर मागायला कुठं जाणार. खायला तर रोज लागतय. काहींनी अर्ध्या शटरवर पैसे कमविले तर कोणी वाली नाही म्हणून मागतकरी नियमात राहीले. पैसेवाल्यांचे काहीच अडले नाही तर नाहीरे वर्गाच्या व्यथा भयानक आहेत. आता लॅाकडाउन उठल्याने धंदे चालू व्हायला लागले तसे मागणारे पण घराबाहेर पडू लागलेत. परंतु, लॅाकडाउनने धंदा बसल्याने मागतकऱ्यांची झोळी भरत नाही.

यवत येथील डवरी गोसावी समाजातील बापू शिंदे व बहुरूपी शिवाजी शिंदे बदलत्या परिस्थितीचे वर्णन करताना म्हणाले, ‘रितीरिवाज बुडाल्यानं आमची झोळी भरत नाही. त्यात ही महामारी आली. गेली दीड वर्ष अर्ध्या पोटानं दिस काढत आहे. मजुरी काम येत नाही म्हणून कुणी कामावर पण घेत नाही. कला, परंपरा ही जास दिवस चालणार नाय म्हणून नातवंडांना साळत घातलया. मानधनासाठी मोर्चा काढला पण अजून ते मिळालेच नाही. आमचा निधी गेला कुठं. आमच्याकडे कोणी डोकून बघायला तयार नाय. सरकारनं आमचा पण ईचार करावा.’ यवतचा तृतीयपंथी जोया गुरू म्हणाला, आम्हाला बाकी काही नको, किमान रेशनिंगचे धान्य तरी मिळावे. पाटस येथील गोंधळी संतोष पाचंगे म्हणाले, लॉकडाउनमध्ये मजुरी काम जमत नाही तरी केले. मुले शिकत आहे त्यांना अडचणी सांगता येईना.

शिक्षणासाठी अंगावर घेतला आसूड

बोरीपार्धी (ता. दौंड) येथील पोतराजाचा मुलगा दीपक पवार हा यंदा बारावीत शिकत आहे. परीक्षा झाली नाही. घर खर्च व पुढील शिक्षणाला हातभार लागावा म्हणून लॉकडाउन उठल्यानंतर त्याने अंगावर आसूड मारून घेत भिक्षा मागायला सुरुवात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईतील हरित ऊर्जेच्या पुरवठ्यात वाढ, टाटा पॉवरचा तीन कंपन्यांसोबत करार

UP Government : ​योगी सरकारची मोठी ॲक्शन; समाज कल्याण विभागाचे ४ अधिकारी बडतर्फ, ३ निवृत्त अधिकाऱ्यांच्या पेन्शन कपातीचे आदेश

मूळ ओबीसींनाच तिकीट, भाजपसोबत जायचं नाही; स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत शरद पवारांनी दिल्या सूचना

School Bus Accident: नंदुरबारमध्ये भीषण अपघात! स्कूल बस दीडशे फूट खोल दरीत कोसळली; १ विद्यार्थ्याचा मृत्यू, अनेक जखमी

सॅनिटरी पॅडमध्ये लपलेलं 'हे' काय आहे? "तुमचं पॅड खरंच स्वच्छ आहे का?" उजेडात दिसलं धक्कादायक सत्य... जगभरात Viral Video

SCROLL FOR NEXT