priya shilaskar.jpg 
पुणे

लॉकडाउनमध्ये घरीच केक बनवून 'तिने' कमावले तब्बल...

सागर आव्हाड

पुणे : लॉकडाउनच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर काहीजण नोकऱ्या वाचवण्यासाठी धडपडतायेत. मात्र, अंगावर आलेली जबाबदारी सांभाळून लॉकडाउनच्या काळात पुण्यातील प्रिया शिळसकर या तरुणीने केक बनविण्याच्या माध्यमातून तब्बल एक लाख रुपयांच आर्थिक उत्पन्नही मिळवलं आहे. प्रिया राजेंद्र शिळसकर हिचे वय 24 वर्ष असून प्रियाने एमबीए पर्यंत शिक्षण पूर्ण केलं.

घरी आईची जबाबदारी असल्याने प्रियाने आपली नोकरी सोडली आणि केक बनवण्याचा कोर्स पूर्ण केला आणि घरीच केक बनवायला सुरवात केली. लॉकडाउनच्या काळात नेमकं काय करायचं हा प्रश्न अनेकांसमोर उभा राहिला. मात्र, या प्रश्नाचं उत्तरं प्रियाने शोधलं. तिने कामाला सुरूवात केली. ती म्हणजे केक बनवण्याच्या कामाला. लॉकडाउनच्या काळात केक शॉप बंद असल्यानं अनेकांना वाढदिवसाला केक मिळत नव्हते...मात्र ही गरज प्रियानं घरी केक बनवून भागवली. घरच्या घरी केक बनवायचा आणि पार्सल डिलीव्हरी द्यायची. तिने लॉकडाउनच्या कळात तब्बल 200 केकची घरून विक्री केलीये. चांगल आर्थिक उत्पन्नही मिळवलंय.

आज तिच्याकडे बरेचसे फ्लेवर्स हे विक्रीसाठी उपलब्ध आहेत..एक किलोपासून दहा किलोपर्यंतचा ती केक बनवते. या कामात तिला तिची लहान बहिण मदत करते. तर वडिलांचाही मोठा हातभार तिच्या कामात लागत आहे. प्रियाची आई दृष्टीहीन आहे. प्रियाला हे सगळं सांभाळून तिचा हा केकचा व्यवसाय सांभाळावा लागतो. लेकीची कला बघायला जरी आईला दृष्टी नसली तरी देखील लेकीच्या कामाचा अभिमान आहे. आम्ही तिला अजून प्रोत्साहन देणार असं तिची आई मंदाकिनी शिळसकर यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

प्रियाने आज बनवलेला केक हा कोरोना वॉरियर्सना समर्पित केलाय. प्रियाने लॉकडाउनमध्ये अनेकांना प्रेरणा देणारं काम केलंय. केकची विक्री करायला शॉपचं असावं असं काही नाही तर फक्त जिद्द हवी...आणि याच जिद्दीच्या जोरावर तिने हे सगळं उभंही केलं...तिला भविष्यात केक शॉप उभं करायचंय...आणि आपल्या केकचा ब्रँण्डदेखील बनवायचाय...अनेक महिलांनी प्रियासारखा प्रयोग घरी केला तर बरंच काही होऊ शकतं एवढं मात्र नक्की...
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Maskar Silver Medal : मुलीच्या रायफलसाठी वडिलांनी विकली जमीन; कोल्हापूरच्या सोनम मस्करचे आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक

Satara Crime: जमिनीचा वाद पेटला अन्‌ भावकीतील युवकावर दांडक्याने हल्ला; उपचार सुरू असतानाच मृत्यू

Importance of Literature : मनाची लाखो शकलं करणाऱ्या काळात साहित्य का गरजेचं आहे?

Marathi News Live Updates : भुसावळ शहरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मानवी मृतदेह

Pune News: कुत्रा भुंकल्याने वाद पेटला; वाघोलीत दोन बहिणींवर दगड, सळई अन् लाथाबुक्क्यांनी हल्ला

SCROLL FOR NEXT