cm.jpg 
पुणे

राज्यात लॉकडाउन वाढवण्याविषयी मुख्यमंत्री म्हणाले...

सकाळवृत्तसेवा

पुणे :"करोना विरुद्धच्या लढाईत आपण सर्वजण सैनिक आहोत, आजवर जे केलंय हे तुम्हाला विश्वासात घेऊनच. संयमाच्या जिद्दीच्या जोरावर आपण ही लढाई लढत आहोत, यात कुठेही गडबड-गोंधळ होता कामा नये. संकट गंभीर असलं तरीही सरकार खंबीर आहे,  त्यामुळे घाबरू नका," असा विश्वास देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात लॉकडाऊन आणखी वाढणार या अफवेलाही विराम दिला. 

'मुंबई लष्कराच्या ताब्यात देणार, राज्यात लॉकडाऊन आणखी वाढवणार अशा अफवा दिवसभर होत्या.  महाराष्ट्रातील नागरिकांना दिलेल्या संदेशात मुख्यमंत्री म्हणाले, 'अफवांवर विश्वास ठेवू नका. लष्कर कशाला हवंय. तुम्हाला विश्वासात घेऊनच आतापर्यंत काही पावलं उचलली आहेत. लॉकडाऊन टप्प्याटप्प्यानं वाढवला. त्यामुळं मुंबईत लष्कराची गरज नाही. लष्कराचे जवान सीमेवर देशाचं रक्षण करतील. राज्यातील प्रत्येक नागरिक जवान आहे. हे युद्ध आपल्याला लढायचं आहे. '

'लॉकडाऊन हा पिंजरा आहे. त्यात राहायला कोणालाही आवडणार नाही. लाॅकडाऊन  वाढवण्याची कोणालाही हौस नाही, मात्र संक्रमित क्षेत्रात आपल्याला विशेष काळजी घ्यावीच लागेल. तसेच राज्यसरकार त्यासाठी आपल्या पद्धतीने विशेष दक्षता घेत आहे, तसेच विविध उपाययोजनाही करीत आहे. त्याला तुम्ही साथ द्या. ज्या भागात रुग्णांची संख्या अधिक आहे तेथे घरातच राहून योग्य ती काळजी घेऊन या लढाईतील योद्धे म्हणून काम करायला हवे, असेही आवाहन ठाकरे यांनी केले.

सगळ्यांना सुखरूप घरी पाठवू
राज्यात अडकलेल्या सगळ्या मजूरांना सुखरूप त्यांच्या घरी पाठवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळं कोणीही घाबरून जाऊ नये आणि घाई करू नये, असं आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी केलं. ज्याप्रमाणे महाराष्ट्राबाहेर अडकलेल्यांना परत आणण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात अडकलेल्यांना त्यांना त्यांच्या घरी सुखरूप पाठवण्याचे नियोजन करत असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. आज, पहाटे औरंगाबाद जिल्ह्यात घडलेली दुर्घटना अतिशय दुदैवी असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. या घटनेच्या पार्श्वभूमीवरच त्यांनी राज्यात अडकलेल्या मजूर आणि कामगारांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kishor Kadam : अभिनेता किशोर कदम यांनी उजेडात आणला आणखी एक भयंकर प्रकार, व्यक्त केली 'ही' भीती; मुख्यमंत्री फडणवीसांकडे महत्त्वाची मागणी

Pune Crime: 'आयुष कोमकर खूनप्रकरणी आंदेकर टोळीतील चौघांना अटक'; गुजरातमधील द्वारका येथून घेतले ताब्यात, सोमवारी न्यायालयात हजर करणार

IND A vs AUS A: विराट, रोहित यांची फक्त हवा... ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या ODI मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, रजत पाटीदार कॅप्टन

Latest Marathi News Updates : दिवसभरात देश विदेशात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर

Pune Fraud: 'चांगल्या परताव्याच्या आमिषाने दोघांची ४८ लाखांची फसवणूक'; सायबर चोरट्यांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT