Sharad Pawar: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू झाली आहे. महायुतीचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडी आणि मित्र पक्षाने कंबर कसली असून वेगवेगळ्या माध्यमातून मतदारांशी संपर्क सुरू केला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार पुण्यात ठाण मांडून आहेत. त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठका, विविध संस्था व संघटनांबरोबर चर्चा केली असून इतर पक्षातील प्रमुख नेत्यांनी पवारांची भेट घेतली आहे. पुणे लोकसभेसाठी काँग्रेसने सक्षम उमेदवाराचा आग्रह धरावा, अशी मागणी पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी पवारांकडे केली आहे. पवार पुण्यात मुक्कामी असल्याने विविध राजकीय नेत्यांनी बुधवारी त्यांची भेट घेत चर्चा केली. यामध्ये धनगर समाजाचे नेते महादेव जानकर, स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना वैदर्भीय भाषेत मार्गदर्शन करणारे नीतेश कराळे गुरुजी यांच्यासह इतरांशी चर्चा केली.
शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी आमदार जयदेव गायकवाड, अंकुश काकडे, श्रीकांत शिरोळे आदी पदाधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी पवार यांची भेट घेतली. पुणे लोकसभेसाठी काँग्रेसने सक्षम उमेदवार दिला पाहिजे. त्यामुळे भाजपची प्रमुख प्रचार यंत्रणा येथेच अडकून पडायला हवी. काँग्रेसने कमी शक्ती असलेला उमेदवार दिल्यास भाजपकडून आपल्याला बारामती, शिरूर येथे त्रास होऊ शकतो, असे पवार यांना सांगितले.
यावर गुरुवारी (ता. २१) होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीत हा मुद्दा मांडला जाईल, असे पवारांनी सांगितल्याचे पदाधिकारी म्हणाले. दरम्यान, पुणे महापालिकेतील मनसेचे माजी नगरसेवक राहुल तुपेरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आरिफ बागवान, शेतकरी कामगार संघटनेचे प्रवक्ते भगवान जाधव, पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील खेडेकर, खासदार गिरीश बापट यांचे स्वीय सहाय्यक सुनील माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.
‘आत्मविश्वास नसल्याने मनसेची मदत’
प्रसार माध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, ‘‘सातारा लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीने प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र मेळावे घ्यावे, अशी चर्चा बैठकीत झाली आहे. मनसेने भाजपला का पाठिंबा दिला? हाच प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला पडला आहे. भाजपकडे एवढे संख्याबळ असताना त्यांना आणखी पक्षाची गरज का पडली? याचा अर्थ आपण विजयी होऊ, असा आत्मविश्वास त्यांना नाही. म्हणून त्यांना इतर पक्षांची मदत घेऊन निवडणुकीत उतरावे लागत आहे. माढाबाबत भाजपमधील कुणीही संपर्क केला नाही. आम्ही उमेदवार ठरवत आहोत. मोहिते पाटील यांचा संपर्क झालेला नाही.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.