Pune
Pune 
पुणे

पुणे : उमेदवारनिश्‍चितीत भाजपचा कस

संभाजी पाटील

शहरी नवमतदारांवर प्रभाव पडेल, असा कोणताही करिष्मा भाजप विरोधकांकडून अद्यापतरी घडलेला नाही. त्यामुळे या नवमतदाराला खेचून आणण्यासाठी काँग्रेस आघाडी किंवा इतर पक्ष काय करणार यावरच पुण्याच्या निकालाची दिशा निश्‍चित होणार आहे.

पुणे मतदारसंघात गेल्या निवडणुकीत तब्बल सव्वातीन लाख मतांच्या फरकाने मिळालेला विजय, त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत 
शहरातील आठही मतदारसंघातले घवघवीत यश आणि सव्वा वर्षापूर्वीच्या महापालिका निवडणुकीत पालिकेच्या इतिहासात प्रथमच भाजपने स्वबळावर मिळवलेली सत्ता अशा स्थितीतील भाजपचा सामना सक्षम उमेदवाराच्या शोधातील काँग्रेस आघाडीला करावा लागेल. 

सुरक्षित मतदारसंघ असल्याने सहाजिकच येथून भाजपच्या इच्छुकाची संख्या मोठी आहे. खासदार अनिल शिरोळे यांनी साडेचार वर्षात राज्य व केंद्र सरकारशी समन्वय साधत शहरातील प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न केला. भाजपमधील सर्व गटांना सोबत ठेवून केलेले काम ही शिरोळेंची जमेची बाजू. पण त्यांना उमेदवारीसाठी पुन्हा एकदा पालकमंत्री गिरीश बापट यांच्याशी झगडावे लागणार आहे. 

गेल्याच निवडणुकीत बापट लोकसभेला इच्छुक होते, पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही. या वेळी मात्र ते दीड वर्षापासून प्रयत्नशील आहेत. 
पुण्यातील मेट्रो, स्मार्ट सिटी, पीएमआरडीए, रिंगरोड, विकास आराखडा अशी अनेक कामे बापटांनी खात्यावर नोंदविलीत. त्यामुळे पुण्यात भाजपची उमेदवारी कोणाला याचा निर्णय अंतिम क्षणालाच होण्याची शक्‍यता आहे. एका बाजूला शिरोळे, बापट; दुसरीकडे शहराध्यक्ष योगेश गोगावले, उमेदवारीसाठी इच्छुक असताना वादग्रस्त विधानांनी सतत चर्चेत असणारे राज्यसभा सदस्य संजय काकडे यांनीही पुण्याच्या भाजपच्या जागेवर दावा केलाय. ‘आपण लोकसभा लढविणारच’ असा संकल्प काकडेंनी केल्याने ते कोणत्या पक्षातून निवडणूक लढविणार याबाबत उत्सुकता आहे. काँग्रेसमधील स्थानिक नेत्यांनी काकडेंच्या उमेदवारीस विरोध केलाय. त्यामुळे श्रेष्ठींची पंचाईत झाली आहे. 

पुण्याच्या जागेवर सातत्याने दावा करून हवा तापविणाऱ्या राष्ट्रवादीने पुण्याची जागा काँग्रेसलाच सोडावी लागणार, हे जवळपास मान्य केलंय. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारीबाबत उत्सुकता आहे. प्रदेश काँग्रेसने माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड आणि महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांची नावे दिल्लीला पाठविली आहेत. मात्र माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, आमदार अनंत गाडगीळ आणि उल्हास पवार हे ज्येष्ठ नेतेही आपापल्या पद्धतीने प्रयत्नशील आहेत. 

गेल्या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर असणारा मनसे या वेळी काय करणार, याचे चित्र अद्याप स्पष्ट नाही. ‘आप’ने पुण्यात लढण्याचे जाहीर केले, तर ॲड. प्रकाश आंबेडकरांची वंचित विकास आघाडीही पुण्यात उमेदवार शोधत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT