Lonikand police arrested seven thieves fo bike theft
Lonikand police arrested seven thieves fo bike theft 
पुणे

दुचाकी चोरणाऱ्या सात जणांना लोणीकंद पोलिसांनी केले गजाआड

सकाळवृत्तसेवा

वाघोली(पुणे) : दुचाकी चोरणाऱ्या सात जणांना लोणीकंद पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली. त्यांच्याकडून चोरीच्या आठ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अक्षय विजय सूर्यवंशी, अजय दीपक चव्हाण, गणेश हनुमंता मंगवडे (तिघेही रा. लोणीकंद), रशीद मेहबूब शेख (रा. मुखेड,नांदेड), निलेश लिंबराज आडमुठे (रा. अष्टापुर), सलमान बाबु शेख (रा. पेरणे फाटा), रियाझ मेहबूब शेख (रा. कोरेगाव भीमा) असे दुचाकी चोरीप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

वाघोलीसह लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वाहन चोरींच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. गुन्हे शोध पथकाने याकडे लक्ष केंद्रित करून दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा तपास केला. वेगवेगळ्या गुन्ह्यातील सात जणांना अटक केली. यामधील अक्षय सूर्यवंशी, गणेश मंगवडे, सलमान शेख यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. इतर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुचाकी चोरीचे गुन्हेही उघडकीस आले आहेत.


राजसाहेबांच्या भेटीने मनसैनिकांना दहा हत्तींचे बळ

सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक हणमंत पडळकर, बाळासाहेब सकाटे, नवजीवन जाधव, श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, दत्ता काळे, समीर पिलाणे, ऋषिकेश व्यवहारे, संतोष मारकड, सूरज वळेकर, बाळा तनपुरे, नितीन मोरे, मारुती दुबळे यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT