Mahadev Jankar called on Sharad Pawar 
पुणे

भाजपच्या गोटात 'टिक टिक' वाजवणारी बातमी, जानकरांनी घेतली शरद पवारांची भेट

सकाळवृत्तसेवा

पुणे : राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. महादेव जानकर आणि शरद पवार यांच्यात तब्बल दीड तास चर्चा झाली. जानकर यांचा रासप हा भाजपचा मित्र पक्ष आहे. जानकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होते. त्यामुळे  जानकर-पवार यांच्या भेटीने  राजकीय वर्तुळात मोठी खलबते होण्याची चर्चा सुरु आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भाजप आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्याने जानकर यांनी पवार यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे. या भेटीने भाजप मित्र पक्ष गमावू शकतो तर महाविकास आघाडीला बळ मिळेल अशी चर्चा रंगते आहे. पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये पवार आणि जानकर यांची भेट झाली. 

राजकीय मुद्यांवर या भेटीत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात भाजपचे सरकार असताना जानकर हे कॅबिनेट मंत्री होते. जानकर हे  देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या गोटातले मानले जातात. याच काळात लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदार संघात पवार यांना रोखण्यासाठी भाजपने जानकर यांचा वापर केला होता.

अकरावीच्या दुसऱ्या फेरीतील प्रवेशासाठी ७ हजार विद्यार्थ्यांची सहमती

गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने जानकर यांच्या माध्यमातून पवार यांना आव्हान दिले होते. त्यामुळे पवार - जानकर यांच्यामध्ये टोकाचा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. त्याच जानकरांनी पवार यांची भेट घेतल्याने भाजपच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सरकार आहे. या सरकारची जवळीक साधण्यासाठी पवार यांची भेट घेतल्याचेही सांगण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये या दोन्ही नेत्यांची भेट झाली नव्हती. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

Nasrapur Case Verdict: नसरापूर अत्याचार प्रकरणात शिक्षा जाहीर; भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेप यावर निर्णय?

Gangapur Fraud : गंगापूरमध्ये खोट्या भीतीचा डाव; पतीच्या संबंधाचे खोटे आमिष दाखवून विवाहितेची पाच लाखांची लूट

Pune Nashik Highway Crash: पुणे-नाशिक महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात; आयटी अभियंत्याचा मृत्यू, पत्नींसह सात जखमी

SCROLL FOR NEXT