Mahametro requests Uttar Pradesh, West Bengal and Madhya Pradesh to allow aspiring laborers to come to Pune 
पुणे

मजुरांना परत आणण्यासाठी महामेट्रोने 'असे' उचलले पाऊल!

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोनामुळे मजुरांचा तुटवडा भासू लागल्यामुळे महामेट्रोने उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल आणि मध्य प्रदेश येथील प्रशासनाला साकडे घातले आहे. तेथून परतण्यास इच्छूक असलेल्या मजुरांना पुण्यात येण्यासाठी तातडीने परवानगी द्यावी, अशी मागणी महामेट्रोने केली आहे. मजुरांच्या तुटवड्याअभावी महामेट्रेचे पुणे आणि पिंपरी
चिंचवडमधील काम सुमारे 25 टक्के क्षमतेनेच सध्या सुरू आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

स्वारगेट ते पिंपरी चिंचवड आणि वनाज ते रामवाडी मार्गावर महामेट्रोचे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये काम सुरू आहे. त्यावर या पूर्वी सुमारे 26 मजूर काम करीत होते. 25 मार्चपासून लॉकडाउन सुरू झाल्यावर महामेट्रोने मजुरांचा सांभाळ केला होता. परंतु, 8 मे पासून श्रमिक स्पेशल ट्रेन आणि मजुरांसाठी बस सुरू झाल्यावर टप्प्याटप्प्याने सुमारे 1800 मजूर आपआपल्या गावांकडे परतले आहेत. त्यामुळे सध्या सुामरे 800 कामगारांवरच मेट्रोचे काम सुरू आहे.

पुणे : अपघातास कारणीभूत ठरलेली अष्टापुर येथील 'ती' विहिर बुजवणार

दोन्ही शहरांत महामेट्रेचे सुमारे 16 लेबर कॅंप आहेत. तेथे हे 800 मजूर राहत आहेत. त्यांना अन्न-धान्य महामेट्रोकडून पुरविले जाते. तसेच मास्क, सॅनिटायझर आदी वैद्यकीय सुविधाही पुरविल्या जात आहेत. येरवडा येथील लॅबर कॅंपमध्ये गेल्या आठ दिवसांत सुमारे 20 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. त्यातील 5 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. उर्वरित रुग्णांची प्रकृती सुधारत आहे. त्यात कोणाचीही प्रकृती चिंताजनक नाही, असे महामेट्रोकडून सांगण्यात आले. या कॅंपमध्ये सुमारे 70 मजूर राहतात. त्या सर्वांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यातील 50 मजुरांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेतत. तरीही या कॅंपमध्ये विशेष खबरदारी घेतली जात आहे, असेही महामेट्रोने स्पष्ट केले.

डॉ. बाबा आढाव म्हणताहेत, महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी माझा विचारही करू नका, कारण....

मेट्रोसाठी पिंपरी चिंचवडमध्ये दापोडी, फुगेवाडी आणि पिंपरीमध्ये तर, पुण्यात नगर रस्ता, कर्वे रस्ता, मुठा नदीचे पात्र, रेंजहिल्स आणि कोथरूड डेपो आदी ठिकाणी कामे सुरू आहेत. मात्र, मजुरांच्या तुटवड्यामुळे तेथे सध्या सुमारे 25 टक्के क्षमतेनेच काम सुरू आहे. तसेच भुयारी मेट्रोसाठी या पूर्वी रेंजहिल्स ते स्वारगेट दरम्यान 24 तास काम सुरू होते. आता हे काम 12 सुरू आहे. मजुरांचा तुटवडा दूर करण्यासाठी महामेट्रोतर्फे विविध राज्यांत प्रयत्न सुरू आहेत. त्याला अनुकूल प्रतिसाद मिळत आहे. बिहारमधूनही पाच अभियंते शहरात नुकतेच परतले आहेत.

- व्यसनेही झाली अनलॉक; लॉकडाउनमुळे थांबलेली तलफ पुन्हा वाढली

''मजुरांचा तुटवडा दूर करण्यासाठी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पश्‍चिम बंगालमध्ये प्रशासनाशी संपर्क साधला आहे. पुण्यात मेट्रोच्या कामासाठी येऊ इच्छिणाऱ्या मजुरांना तातडीने परवानगी द्यावी, अशी विनंती प्रशासनाला एका पत्राद्वारे करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील 3 जिल्ह्यांतून सुमारे 200 मजूर येणार आहेत. त्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अन्य राज्यांतूनही लवकरच मजूर येतील आणि मेट्रोचे काम पूर्ववत होईल.''
- हेमंत सोनवणे (महाव्यवस्थापक)

- डॉ. बाबा आढाव म्हणताहेत, महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी माझा विचारही करू नका, कारण...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Accident : चाचडगाव टोलनाक्याजवळ भीषण दुर्घटना; ईर्टिगा-स्कॉर्पिओच्या धडकेत गुजरातच्या कुटुंबावर काळाचा घाला

AI Toys Ban : लहान मुलांचे 'बोलके खेळणे' ठरू शकते खतरनाक! सरकारने घेतली मोठी अ‍ॅक्शन; काय मार्केटमधून गायब होतील सगळे गॅजेट्स?

Latest Maharashtra News Updates Live : हल्ल्यामागील खऱ्या सुत्रधारांना पोलिसांनी अटक करावी - ओवेसी

Devendra Fadnavis : मराठी माणसाचे नाव घेऊन राजकारण करण्यापलीकडे ठाकरे बंधुंनी काय केलं? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निशाणा

Hardik Pandya : २० षटकार, ११ चौकार... हार्दिक पांड्याला आली लहर अन् करतोय कहर; १९ चेंडूंत पूर्ण केले अर्धशतक अन्...

SCROLL FOR NEXT