Students_SSC_HSC 
पुणे

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनो, टेन्शन करा दूर, प्रश्नसंच करा डाउनलोड!

मीनाक्षी गुरव

पुणे : तुम्ही दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेची तयारी करता आहात का!, परीक्षेची तयारी नेमकी कशी करायची कळत नाहीये!! अहो, मग टेन्शन कशाला घेताय. त्वरित राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना सरावासाठी प्रश्नसंच उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे आता लवकरात लवकर एससीईआरटीच्या संकेतस्थळावर जा आणि प्रश्नसंच डाऊनलोड करून घ्या. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात गेल्या वर्षापासून ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादा लक्षात घेऊन राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने इयत्ता पहिले ते बारावीचा अभ्यासक्रम २५ टक्क्यांनी कमी केला. मात्र, दरम्यान दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा यंदा एप्रिल-मे महिन्यात घेण्यात येत आहेत. अद्यापही अनेक शाळांमध्ये अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झालेला नसल्याची आणि काही विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाइन शिक्षण पोचू न शकल्याचे वास्तव समोर येत आहे. तसेच परीक्षेची तयारी अधिक चांगल्याप्रकारे करता यावी, या दृष्टीने शिक्षण विभागाकडून प्रश्नसंच तयार करण्यात यावा, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून विविध पातळ्यांवर होत होती.

या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्य परिषदेला त्याबाबत सूचना केल्या होत्या. त्यानुसार परिषदेने प्रश्नसंच तयार केले आहेत. पहिल्या टप्प्यात काही दहावी-बारावीच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाचे काही विषयांच्या प्रश्नसंच परिषदेच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. लवकरच इतर विषयांचे प्रश्नसंच संकेतस्थळावर डाऊनलोड करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती परिषदेचे उपसंचालक विकास गरड यांनी दिली आहे. 

दहावी-बारावीचे प्रश्नसंच येथून करा डाऊनलोड : https://maa.ac.in/index.php?tcf=prashnpedhi 

आता उपलब्ध असलेले प्रश्नसंच : विषय (माध्यम) 
बारावी : जीवशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि सांख्यिकी, इंग्रजी, इतिहास (मराठी/इंग्रजी), भूगोल (मराठी), गणित आणि सांख्यिकी (वाणिज्य)

दहावी : इंग्रजी (प्रथम भाषा), गणित भाग एक आणि भाग दोन, इतिहास आणि राज्यशास्त्र (मराठी/इंग्रजी), भूगोल (मराठी/इंग्रजी), कुमारभारती

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT