Maharashtra State Council Of Examination Sakal
पुणे

राज्य परीक्षा परिषदेच्या ‘आयुक्त’पदावर प्रश्नचिन्ह

आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारण्यात शिक्षणाधिकाऱ्यांचा नकार

मीनाक्षी गुरव : सकाळ वृत्तसेवा

Pune News : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या (Maharashtra State Council Of Examination) वतीने घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेतील (TET) गैरव्यवहार प्रकरणी परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe) याला पुणे पोलिसांनी अटक केली. त्यानंतर टीईटी परीक्षेतील गैरव्यवहार समोर आला, त्यानंतर सुपे यास निलंबित करण्यात आले. परंतु या गैरव्यवहारामुळे आता परीक्षा परिषदेच्या आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारण्यास शिक्षणाधिकाऱ्यांकडून स्पष्टपणे नकार येऊ लागला आहे. गेल्या दहा दिवसांपासून आयुक्त पद रिक्त असल्याने परीक्षा परिषदेच्या कामकाजावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.

आरोग्य विभाग, म्हाडा पेपरफुटी प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी टीईटी परीक्षेच्या निकालात फेरफार करून उमेदवारांचे गुण वाढविल्याच्या कारणावरून परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे याला १७ डिसेंबर रोजी अटक केली. सुपे याला पोलिस कोठडीही देण्यात आलेली आहे. त्यानंतर शिक्षण विभागाने सुपे यांना निलंबित करण्याची कार्यवाही केली. त्यानंतर हे आयुक्त पद रिक्त झाले. दरम्यान, टीईटी गैरव्यवहाराने चर्चेत आलेल्या परीक्षा परिषदेच्या आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्यास शिक्षणाधिकारी नकार देत असल्याची माहिती समोर येत आहे.

परिषदेच्या आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे द्यायचा असा प्रश्न शिक्षण विभागासमोर उपस्थित झाला होता. सध्या परीक्षा परिषदेत हारून आत्तार आणि शैलजा दराडे हे दोन उपायुक्त कार्यरत आहेत. त्यापैकी कोणाला तरी आयुक्तपदाची सूत्रे देणे, सद्यःस्थितीत सोयीचे ठरेल, असा विचार शिक्षण विभागाकडून करण्यात आला. त्यानुसार आत्तार यांच्याकडेच आयुक्तपदाची सूत्रे देण्यावर ठरविण्यात आले. परंतु, आत्तार यांनी हा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्यात स्पष्ट नकार दर्शविला आहे.

आत्तार यांच्याकडे परीक्षा परिषदेतील उपायुक्तपदाची जबाबदारी आहे. त्याशिवाय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयातील सहसंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार यापूर्वीच त्यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे. त्यामुळे असे असताना आणखी एक जबाबदारी स्वीकारल्यास तिन्ही पदांची सूत्रे सांभाळणे शक्य होणार नाही, तसेच एखाद्या पदाला योग्य न्याय देता येणार नाही. त्यामुळे परीक्षा परिषदेच्या आयुक्त पदांची जबाबदारी सांभाळण्यासाठी दुसऱ्या शिक्षणाधिकाऱ्यांची निवड करावी, असे सुचवीत आत्तार यांनी आयुक्तपदाची जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे. दरम्यान, आता दहा दिवस उलटून गेले, तरी परीक्षा परिषदेला आयुक्त पद अद्यापही रिक्त असल्याने अनेक प्रलंबित कामे खोळंबल्याचे चित्र आहे.

राज्य परीक्षा परिषदेतील प्रलंबित विषय :

- इयत्ता पाचवी आणि आठवीच्या

शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल आणि गुणवत्ता यादीची प्रतिक्षा

- ‘टीईटी २०२१’च्या परीक्षेचा निकाल प्रलंबित

- राज्यस्तर राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (एनटीएस) प्रशासकीय कारणास्तव ढकलली पुढे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ! हैदराबादमध्ये पेट्रोल 116 रुपयांवर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल-CNG किती?

Kankavli Assault Case: गणपतीला माहेरी आली, जमिनीच्या वादातून आई-भावंडांसह पाच जणांकडून बेदम मारहाण

सासूसोबत जिनिलीयाचं खास बॉण्डिंग, घरच्या गणपतीची लगबग; देशमुख कुटुंबाचे फोटो व्हायरल

Latest Marathi News Update : धनुष्यबाण राहणार की जाणार? शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सुनावणी

IND vs AFG, T20I: मालिका जिंकण्यासाठी भारत सज्ज! सॅमसनच्या कामगिरीकडे लक्ष, पाचव्या गोलंदाजाची चिंता कायम; कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT