Supreme-court 
पुणे

अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत 'मासू'ची सर्वोच्च न्यायालयात धाव; हस्तक्षेप याचिका केली दाखल

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करावी, म्हणून सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर १० ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. यामध्ये म्हणणे मांडण्यासाठी 'महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन'ने (मासू) हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. 

विद्यापीठ अनुदान आयोगाने अंतिम वर्षाच्या परीक्षा व्हाव्यात यासाठी तयारी सुरू केली आहे. या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याच संदर्भात 'मासू'ने हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. 

मासूचे विभाग प्रमुख सिद्धार्थ तेजाळे म्हणाले, "आम्ही हस्तक्षेप याचिकेद्वारे सध्याची वस्तुस्थिती, आकडेवारी आणि संशोधन याची मांडणी केली आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही केलेल्या सर्वेक्षणसुद्धा सादर केलेले आहेत. तसेच या विषयावरील सर्व माहिती त्याद्वारे संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी केलेले पत्रव्यवहारसुद्धा याचिकेद्वारे सादर केले आहेत. हस्तक्षेपाच्या अर्जात कोविड १९ ची सद्य परिस्थितीत आणि पुढील अनिश्चितता यामुळे विद्यापीठ परीक्षा घ्यायची की नाही हा निर्णय संबंधित राज्यांकडेच ठेवला जावा, अशी मागणी केली आहे. या प्रकरणी १० ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे. 

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनने (मासू) सुरवातीपासूनच विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आवाज उठविलेला आहे. दिनांक १७ मार्च २०२० रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन कार्यवाहक सरन्यायाधीशांना पत्र लिहून हस्तक्षेप याचिका केली होती आणि त्याआधारे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याने उपाययोजना कराव्यात, या सूचना लक्षात घेऊन राज्याने सर्व परीक्षा पुढे ढकललेल्या होत्या. तसेच १५ जून २०२० रोजी आणखी एक पत्र न्यायाधीशांना लिहले होते, असे तेजाळे यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Chief Minister : 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यास सुखाचे दिवस येतील'; महायुतीतील मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

Nashik Honey Trap: मैत्रिणीसोबत लॉजवर गेला, हनी ट्रॅपमध्ये अडकवून ७ लाखांची खंडणी मागितली; दोघाना अटक

Mumbai Local: बंद दरवाजाची साधी लोकल लांबणीवर, मुंबईकरांच्या प्रतीक्षेत वाढ; सुरक्षा चाचणीत तांत्रिक अडथळे

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे यांच्या भेटीला अभिजीत दिपके, सरकारवर हल्लाबोल

Ganesh Chaturthi 2026: १४ सप्टेंबरला बाप्पाचे आगमन! जाणून घ्या अचूक तिथी ,प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त अन् संपूर्ण पूजा विधी....

SCROLL FOR NEXT