भोसरी - अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांनी तळवडे, त्रिवेणीनगर, रूपीनगर व परिसरात काढलेली पदयात्रा.
भोसरी - अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांनी तळवडे, त्रिवेणीनगर, रूपीनगर व परिसरात काढलेली पदयात्रा. 
पुणे

Vidhan Sabha 2019 : भोसरी : प्रश्‍न सोडविण्याची धमक लांडे यांच्यातच - प्रवीण भालेकर

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019 : पिंपरी - ‘अनधिकृत बांधकामे, शास्तीकर आणि प्रलंबित प्रश्‍न सोडविण्याची धमक केवळ विलास लांडे यांच्यामध्येच आहे. त्यासाठी तळवडे, रूपीनगर आणि त्रिवेणीनगर या भागाने त्यांना पुन्हा आमदार करण्याचा निर्धार केला आहे. तळवडे गाव ज्याच्या पाठीशी उभे राहते, तो निवडणुकीत नक्की निवडून येतो, असा आजपर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे आता लांडे यांचा विजय निश्‍चित आहे,’’ असा विश्‍वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रवीण भालेकर यांनी व्यक्त केला.

भोसरी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांनी बुधवारी तळवडे, त्रिवेणीनगर, रूपीनगर व परिसरात प्रचार केला. त्यांनी पदयात्रा काढून नागरिकांशी संवाद साधला. त्या वेळी भालेकर बोलत होते. नगरसेविका पौर्णिमा सोनवणे, संगीता ताम्हाणे, शिवाजी महाराज नखाते, रंगनाथ महाराज भालेकर, बाळासाहेब वाळुंज, मनसेचे विभागप्रमुख विशाल मानकरी, सुजाता काटे, संगीता देशमुख, अरुण थोपटे, सुधाकर दळवी, संदीप जाधव, हरिभाऊ महाराज ताम्हाणे, अंकुश नखाते, तळवडे तानाजी बाटे, कुंदन भालेकर, सुरेश चव्हाण, हिरामण नखाते, तुकाराम भालेकर उपस्थित होते.

भालेकर म्हणाले, ‘‘महापालिकेतील समाविष्ट गावातील नागरिकांना चुकीच्या पद्धतीने मिळकतकर आकारला होता. लांडे यांनी राज्य सरकारकडून समाविष्ट गावांचा तब्बल ७२ कोटींचा मिळकतकर माफ करून आणला. सामान्यांसाठी अशा प्रकारचे काम करणारे लांडे हे शहरातील पहिले आमदार आहेत. या निर्णयाचे त्यांनी मार्केटिंग करून राजकीय फायदा उठविला नाही. त्यामुळे समाविष्ट गावांतील नागरिक त्यांच्या पाठीशी उभे आहेत.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT