नाना पेठ - एमआयएम उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत (डावीकडून) बॅरिस्टर असुउद्दीन ओवेसी, इम्तियाज जलील, हिना मोमीन, जाहिर शेख आणि डॅनियल लांडगे.
नाना पेठ - एमआयएम उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत (डावीकडून) बॅरिस्टर असुउद्दीन ओवेसी, इम्तियाज जलील, हिना मोमीन, जाहिर शेख आणि डॅनियल लांडगे. 
पुणे

Vidhan Sabha 2019 : मुस्लिमांना आरक्षण का नाही? - ओवेसी

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019 : पुणे - देशात आर्थिक निकषांवर आरक्षण दिले जाते. मराठ्यांना आरक्षण दिले जाते. मुस्लिम समाजही मागासलेला आहे; पण त्यांना आरक्षण नाही. हा कुठला न्याय? असा सवाल एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुउद्दीन ओवेसी यांनी भाजप सरकारला केला. काँग्रेस पक्षाचे अस्तित्व संपत चालले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात विरोधी पक्षाची पोकळी निर्माण झाली आहे. ती पोकळी एमआयएमच भरून काढू शकतो, असा विश्‍वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.

एमआयएमच्या पुणे कॅंटोन्मेंटमधील उमेदवार हीना मोमीन, वडगाव शेरी येथील डॅनियन लांडगे आणि हडपसर येथील जहीर शेख यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत ओवेसी यांनी हा सवाल केला. या वेळी खासदार इम्तियाज जलील, पक्षाचे पश्‍चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अकिल मुजावर, शफीउद्दीन काझी, नगरसेविका सोनाली लांडगे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे भरत कांबळे यांनी पक्षात प्रवेश केला. ओवेसी यांचे आगमन होताच ‘आया रे आया, शेर आया’ अशा घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी मैदान दणाणून सोडले, तर पंतप्रधान मोदी यांचे नाव न घेता, ‘..चोर है’ अशा घोषणा दिल्या. काँग्रेसची परिस्थिती वाईट झाली आहे. जगातील सर्वांत मोठे कॅल्शिअमचे इंजेक्‍शन दिले तरी हा पक्ष आता उभा राहू शकत नाही. पक्षाला नेता राहिला नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पक्षाचा कॅप्टनच पळून गेला आहे. जे आहेत, ते लढाईला तयार नाहीत, अशा शब्दांत ओवेसी यांनी काँग्रेसची खिल्ली उडविली. काँग्रेससह भाजप- शिवसेनेवर टीका करताना ते ‘फॅसिझम’चे राज्य आणू पाहत आहेत, असा आरोपही त्यांनी या वेळी केला. 

मुस्लिम समाजात पन्नासहून अधिक मागास जाती आहेत. मुस्लिम समाज मराठा समाजापेक्षा अधिक गरीब आहे. आतापर्यंत मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री झाले; पण मुस्लिम समाजाचे केवळ ए. आर. अंतुले हे एकच मुख्यमंत्री झाले आहेत. तरीदेखील या समाजाला आरक्षण का नाही, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

ओवेसी म्हणाले,‘‘भाजप सत्तेवर आल्यापासून मुस्लिम समाजाला टार्गेट केले जात आहे. ‘मॉब लिचिंग’सारख्या घटना वाढल्या आहेत. मारणाऱ्यांना शिक्षा करण्याऐवजी सत्ताधाऱ्यांकडून त्यांना संरक्षण दिले जात आहे. मी त्या विरोधात बोललो तर भडकविणारे भाषण करतो, अशी टीका करतात. माझे त्यांना जाहीर आव्हान आहे. त्यांनी चर्चेला यावे. जातीयवादी म्हणून टीका केली जाते. मी जातीयवादी नाही.’’या वेळी इम्तियाज जलील यांच्यासह अन्य नेत्यांची भाषणे झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT