पुणे

पुण्यात थंडीचा कडाका वाढणार; लवकरच शेकोटी लागणार पेटवायला!  

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुढच्या काही दिवसांमध्ये राज्यात थंडीचा कडाका वाढणार आहे. विशेषतः पुणे, मुंबई आसपासच्या परिसरात तापमानात मोठी घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

सध्या उत्तरेकडील राज्यांमध्ये गारठा वाढल्याने याचा राज्यातील हवामानावर परिणाम होणार आहे. थंडीसाठी वातावरण पोषक असल्याने अजून दोन दिवस पुण्यामध्ये गारठा कायम राहणार आहे. विदर्भाच्या काही भागांत आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या आठवड्याच्या सुरुवातील राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. यानंतर आता बहुतेक ठिकाणी आकाश निरभ्र असून थंडीचा पारा वाढण्यास सुरुवात झाली आहे. रविवारी म्हणजेच २० डिसेंबरला पुण्यात किमान तापमान १३.३ अंश सेल्सियस तर कमाल तापमान २९ अं. से राहाणार असल्याचा अंदाज  हवामान विभागाने वर्तवला आहे.

थंडी का वाढली?- उत्तर भारतात काही ठिकाणी थंडीची लाट पसरली आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान , हरियाणा या राज्यांमध्ये तापमानाचा पारा खाली आला आहे. यातच महाराष्ट्रात सध्या हवामान कोरडे असून, पुढील एक आठवडा ते कोरडेच राहाणार असल्याचे हवामान शास्त्र विभागाच्या संकेत स्थळावरुन स्पष्ट होते. याचाच परिणाम राज्यातील अनेक भागात झाला असून, थंडीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.  

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

Kalyan Kale: ‘राहुल गांधींवर टीका करण्याची फडणवीसांची उंची नाही’; खासदार कल्याण काळेंचा मुख्यमंत्र्यांना पलटवार

Pune News: नव्या घराचे स्वप्न अधुरेच राहिले; बांधकामाला पाणी मारताना कैलास बेनके यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

Maharashtra Drought: दुष्काळाची घोषणा कागदावर नको, शेतकऱ्यांच्या खात्यात मदत द्या; दीपिका चव्हाण यांचा सरकारकडे आग्रह

SCROLL FOR NEXT