Maher provided food to 4423 families of Shirur Haveli 
पुणे

शिरूर हवेलीच्या ४४२३ कुटूंबांना 'माहेर' आधार; 'अशी' केली मदत

सकाळवृत्तसेवा

कोरेगाव भीमा : समाजातील दानशुरांच्या मदतीने निराधारांना आधार देणाऱ्या वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथील माहेर संस्थेलाही कोरोनामुळे उद्याचे भविष्य अवघड दिसत होते. मात्र, डगमगून न जाता समाजातील कोणीही वंचित घटक उपाशी राहू नये, यासाठी स्वत:च्या घासातील अर्धा घास बाजुला काढून माहेरने गरजुंना दिलेला मदतीचा हात अनेकांना दिलासादायक ठरला.  
   
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोणत्याही प्रसिद्धीशिवाय राबवलेल्या ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमाद्वारे माहेरने शिरूर हवेलीच्या २१ गावांमधील सुमारे ४४२३ कुटूंबांना अन्नधान्याची मदत तर केलीच तसेच साडेतीन हजारांपेक्षा जास्त मजुरांना माहेरच्या माध्यमातून पोटभर जेवणही दिले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनामुळे सर्वत्र आर्थिक मंदीमुळे सध्या सर्वच घटकांचे उद्याचे भविष्य अवघड झाले आहे. या स्थितीत सर्वत्र लॉकडाऊन झाल्यामुळे समाजातील अनेक गरजु घटकांची उपासमार होत असल्याचे निदर्शनास येताच माहेरच्या संस्थापिका सिस्टर लूसी कुरियन यांचा जीव कासावीस झाला.  

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
    
उदयाच्या अवघड परिस्थितीत आपले कसे होईल, याची चिंता न करता उपाशीपोटी राहणाऱ्या या बांधवांना कूटूंबातील सदस्य समजून आपल्याकडे असलेल्या जेमतेम अन्नधान्यातून अर्ध्याहून अधिक वाटा या वंचितांनाच वितरीत करण्याचा निर्धार करीत माहेर परिवाराने तो अंमलातही आणला. शिरूर मधील पारधी समाज, विटभटटी कामगार, पेरणे फाटा येथील झोपडपटटी तसेच कोरेगांव भीमा, डिंग्रजवाडी, जातेगाव, मुखई, आपटी, केसनंद, लोणीकंद, वाघोली, वडगाव शेरी, पुणे शहर, पिंपळे जगताप, शिकापूर, फुलगाव, बकोरी, देहू, वढु, केंदूर ठाकरवस्तीसह २१ गावांमधील जवळपास ४४२३ कुटूंबांना अन्न धान्याची मदत दिली. मदतीचा हा झरा अद्यापही सुरुच आहे.

पुण्याची पीएमपी व्हेंटिलेटरवर; करार रद्द करण्यासाठी कंत्राटदारांना नोटिस

एवढेच नव्हे तर मिरज व रत्नागिरी येथील गरजू कुदूंबीयांनाही माहेर संस्थेमार्फत शिधावाटप करण्यात आले. याशिवाय  रस्त्याने जाणाऱ्या राज्यातील व परराज्यातील सुमारे साडेतीन हजारांपेक्षा जास्त मजुरांना माहेर परिवाराने स्वतः तयार केलेले पोटभर जेवण व शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वतःच्या वाहनातून केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

माहेरच्या प्रमुख सिस्टर लूसी कुरियन व अध्यक्षा हिराबेगम मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली अतुल शेळके, विष्णू सुर्यवंशी, सुशिल पोहेकर, रमेश चौधरी, प्रकाश कोठावळे, विजय तवर, राजेंद्र साकोरे, प्रफुल्ल सरदार, आनंद सागर, हरिष अवचर, विनायक गाडे, सुजय नायर, मदन सोनवणे, प्रसेनजीत गायकवाड, रमेश दुतोंडे, मिनी एम. जे. यांनी विशेष परिश्रम घेत गरजुंना तांदूळ, गहू, तेल, डाळ, साखर, कडधान्य, साबण आदी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सातत्याने सुरु ठेवले आहे. 

पुणे शहरातील हॉटेल, मेस, खाणावळी बंद असल्याने शेतमालाला उठाव कमी

भविष्यकाळाची काळजी करण्यापेक्षा आज कोणीही उपाशी राहू नये, हाच माहेरचा प्रयत्न असून समाजातील दानशुरांचे पाठबळ असल्यास प्रत्येक भुकेल्या जीवाला अन्नधान्याचा आधार देत त्यांच्या चेहर्‍यावर आनंद फुलवण्याचा माहेरचा सातत्याने प्रयत्न राहील, अशी ग्वाहीही ल्युसीदिदींनी दिली.

StartupStory: सोशल डिस्टन्सिंगसाठी तरुणानं डोकं लढवलं; तुम्हीही कराल कौतुक

समाज कल्याणासाठी सातत्याने प्रार्थनाही सुरु
कोरोनामुळे सर्वच बाधित घटकांवर ओढवलेली स्थिती व अनेकांची झालेली दुरावस्था, तसेच आलेले नैराश्य दुर व्हावे, यासाठी माहेर संस्थेत सातत्याने सर्वधर्मीय प्रार्थना सुरु असून लवकरच ही स्थिती बदलेल व कोरोनाचा धोका टळून परिस्थिती पूर्वपदावर येईल, असा विश्वास माहेरच्या प्रत्येक सदस्याला वाटतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Bharat Train Food : ‘वंदे भारत रेल्वे’त प्रवाशांना आता स्थानिक पदार्थ दिले जाणार ; रेल्वेमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Messi and Revanth Reddy Football Video : लिओनेल मेस्सीने हैदराबादेत मुख्यमंत्री रेवंत रेड्डींसोबत खेळला फुटबॉल; हजारो चाहत्यांचा उत्साह शिगेला!

PMC Retired Employees : निवृत्तीनंतर दिलासा; २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा मोफत वैद्यकीय उपचार!

Pune Health : कर्करोग निदानासाठी पुणेकरांना मोठा दिलासा; महापालिकेचे पेट स्कॅन सेंटर सुरू; खासगी रुग्णालयांपेक्षा निम्म्या खर्चात!

Soybean MSP : आधारभूत किमत खरेदीत शेतकऱ्यांवर अन्याय नको; आमदार डॉ. संजय कुटे यांनी अधिवेशनात मांडली ठाम भूमिका!

SCROLL FOR NEXT