Major action by the Crime Branch on hawala transactions In pune 
पुणे

पुण्यात हवाला व्यवहारावर मोठी कारवाई; कोट्यवधी रूपयांची रोकड जप्त

पांडुरंग सरोदे

पुणे : बेकायदा गुटखा विक्रीद्वारे प्राप्त केलेल्या मोठ्या रक्कमेची हवाला व्यवहाराच्या माध्यमातून देवाण-घेवाण करण्याचा प्रकार गुन्हे शाखेने बुधवारी मध्यरात्री उघडकीस आणला. शहराच्या मध्यभागात रात्री उशीरापर्यंत कारवाई सुरु होती. त्यामध्ये मोठी रोकड जप्त करण्यात आली असून उशिरापर्यंत रोकड मोजण्याचे काम सुरु होते. या कारवाईत आठ ते नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यात तंबाखूजन्य पदार्थ तसेच गुटखा विक्रीवर बंदी आहे. परराज्यातून आलेल्या गुटख्याची विक्री शहरात करण्यात येते. गुटखा विक्रीतून मिळालेली रोकड हवाला व्यवहाराच्या माध्यमातून पोहचविण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट चारला मिळाली होती. त्यानुसार बुधवारी रात्री पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल, सहाय्यक निरीक्षक अभिजीत चौगुले आणि पथकाने दोन इमारतीत कारवाई केली. या इमारतीत असलेल्या कार्यालयातून हवाला व्यवहाराच्या माध्यमातून गुटखा विक्रीतील रोकड संबंधितांना पोहचविण्यात येत असल्याची माहिती चौकशीत मिळाली. 

पोलिसांनी हवाला व्यवहार करणाऱ्या चार कार्यालयांवर कारवाई केली असून नोव्हेंबरमध्ये लोणीकाळभोर परिसरात बेकायदा गुटखा विक्री प्रकरणात एकाला पकडण्यात आले होते. त्याच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीत बेकायदा गुटखा विक्रीतून मिळालेली रोकड हवाला व्यवहारातून संबंधितांपर्यंत पोहचविण्यात येत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी केलेल्या कारवाईत मोठी रक्कम जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

...फक्त लग्न मोडले म्हणून!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर 3.83? आठव्या वेतन आयोगाच्या बैठकीत विवाद! ..तर पगार किती वाढणार?

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT