lizard.jpg 
पुणे

जुन्नरमध्ये आढळला `हा` मनमोहक दुर्मिळ सरडा

सिध्दार्थ कसबे

पिंपळवंडी (पुणे) : भारतात सरड्यांच्या 15 प्रजाती आढळतात. त्यात माळ सरडा हा दिसायला देखणा असणारा रंगबिरंगी गळ्याचा सरडा खूप लोकप्रिय आहे. तसा माळ सरडा पूर्ण भारतात आणि भारतीय उपखंडात सर्वत्रच आढळतो. उन्हाळ्यात त्यांचा मिलन काळ असल्याने सहज दृष्टीसही पडतो. उन्हाळ्यात या सरड्याची दिसणारी निळी काळी लाल मान उंच करत एखाद्या खडकावर बसलेला हा माळ सरडा आपल्याला खूपदा पहावयास मिळतो. 

जुन्नर तालुक्‍यात माळ सरडा बहुतेक वेळा माळरानावर नेहमी आढळायचा. परंतु, आता याच प्रमाण कमी झालं आहे आणि काही ठराविक ठिकाणीच माळ सरड्याचे दर्शन होताना दिसत. जुन्नर तालुक्‍यातील प्राणी अभ्यासक आकाश डोळस यांनी सांगितले की याच्या डोक्‍याचे तसेच शरीरावरचे खवले लहान असतात पण दिसताना अणकुचीदार दिसतात.

शेपटी गोलाकार असते. या प्रजातींची जास्तीत जास्त लांबी 8 इंच इतकी असते आणि त्यापैकी शेपटीच जेमतेम 5 इंच भरते. नर सरडा मानेवरचा भडक रंग दाखवून मादीला मिलनासाठी आकर्षित करतात. ज्या सरड्याचा रंग अधिक भडक असेल तो तंदुरुस्त ठरवला जातो आणि मादी त्याबरोबर मिलन करते पण कधीकधी या सरड्यांमध्ये मिलनासाठी द्वंद्वयुद्धही पहावयास मिळते. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा 

जणू हाताने वारा घालण्याचा पंखाच जणू... 
दगडावर नाग सारखा फणा वर उचलून हा लहान रंगीत सरपटणारा प्राणी म्हणजे माळ सरडा मिलन काळात जास्तच दृष्टीस पडतो. नर सरड्याच्या घशावरून एखादा त्वचेचा तुकडा लोंबल्यासारखा दिसतो आणि जेव्हा त्यांचा डेटिंग गेम सुरू होतो तेव्हा तो त्वचेचा निळा काळा लाल अशा रंगाचा सैल झालेला तुकडा ते पुढे घेतात आणि तो जणू काही हाताने वारा घालण्याचा पंखाच आहे की काय असा भास होतो बहुतेक याच कारणावरून त्याला fan-throated असे नाव पडले असावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Deepke Apologises : "मी माफी मागतो..."; CJP प्रमुख अभिजित दीपके यांनी आंदोलकांना असे का म्हटले?

Raju Shetti Detained Delhi Police : राजू शेट्टी, दिल्ली पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक; दिल्लीत पोहोचताच राजू शेट्टी, महादेव जानकरांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Live Updates Marathi : शहरात सायबर चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच दिवसात तब्बल ४२ फसवणुकीचे गुन्हे

पालघरमध्ये दिवसाढवळ्या दरोडा! बंदुकीचा धाक दाखवत सोनाराचं दुकान लुटलं, लाखो रुपयांचे दागिने घेऊन लंपास; Video Viral

Atpadi Student NEET Success Story : NEET मध्ये ऑल इंडिया 10 वी रँक, MHT-CET मध्ये 100 Percentile अन् JEE मध्ये 99.63; पाहा कोण आहे मोहनीश भोसले?

SCROLL FOR NEXT