पुणे

मित्रानेच मारला दोन लाखांच्या दागिन्यांवर डल्ला; सीसीटीव्हीतून प्रकार उघड

जनार्दन दांडगे

लोणी काळभोर : घरामध्ये रोजच वावरणाऱ्या मित्राणेच हॉटेलवर जेवायला घेउन जाण्याच्या बहाण्याने निवृत्त शिक्षकाच्या घरी पाऊने दोन लाख रुपयांच्या दागिन्यांना गंडा घातल्याची घटना नुकतीच सीसीटीव्हीच्या माध्यमातून उघडकीस आली आहे. 

रवींद्र शेषराव अवधूत (वय- ४०, रा. आगळगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर) असे चोरी करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असता पोलिसांनी सदर आरोपीला त्याच्या मूळ गावातून ४८ तासात जेरबंद केले.

या प्रकरणी निवृत्त शिक्षक मोहन पंढरीनाथ ढोणे (वय- ६३, रा. मानस सरोवर सोसायटी, उरुळी कांचन, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलिसांत तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रवींद्र अवधूत हा मोहन ढोणे यांच्या परिचयाचा होता. ७ फेब्रुवारीला आरोपीने घरी येऊन मोहन व त्यांच्या पत्नीला उरुळी कांचन येथील एका हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेला होता. जेवायला बसल्यानंतर आरोपी रवींद्र याने तुम्ही या ठिकाणीच बसा मी माझ्या मुलांना जेवायला घेऊन येतो असे म्हणून हॉटेलमधून निघून गेला.

हॉटेलमधून निघून गेल्यानंतर आरोपी रवींद्र हा स्वतःच्या घरी न जाता मोहन ढोणे यांच्या घरी जाऊन त्यांच्या घराचा बंद दरवाजा एका डुप्लिकेट चावीच्या साहय्याने उघडून घरामध्ये प्रवेश केला. व घरामधील सोन्या चांदीचे पावणे दोन लाख रुपयांचे दागिने घेऊन त्या ठिकाणावरून परत मोहन ढोणे बसलेल्या हॉटेलमध्ये त्याच्या मुलांसह गेला. जेवण झाल्यानंतर रवींद्र अवधूत व मोहन ढोणे आपआपल्या घरी निघून गेले.

दरम्यान, मोहन ढोणे हे घरी गेले असता त्यांना घराचा दरवाजा उघडलेल्या स्वरूपात वाढळून आला. घरात जाऊन पाहणी केली असता कपाटात ठेवलेले पावणे दोन लाख रुपयांचे दागिने मिळून आले नाहीत. यावरून चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता रवींद्र हा डुप्लिकेट चावीच्या साहय्याने दरवाजा उघडून घरामध्ये प्रवेश केल्याचे आढळून आले.

याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात रवींद्र याच्यावर गुन्हा दाखल केला असता रवींद्र याने चोरी केल्याचे कबूल केले. आरोपीला त्याच्या मूळगावातून अटक करण्यात आली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक सदाशिव गायकवाड करीत आहेत.

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाम बोट दुर्घटनेत 15 भारतीयांचा मृत्यू; बोटीत असलेल्या 32 भारतीयांची नावं आली समोर

Pune News: कर्तव्य बजावणाऱ्या PSI ला दिलासा; पुण्यातील डेक्कन हॉटेल कारवाईप्रकरणी संदीप कदम यांचे निलंबन मागे

Karad Crime: कऱ्हाड शहर पोलिसांची दमदार कामगिरी! पिस्टल विक्रीस आलेल्या चौघांना अटक; चार देशी बनावटीचे पिस्टल, आठ जिवंत काडतुसे जप्त

MPSC Protest: विद्यार्थ्यांसोबत आजीही मैदानात! एमपीएससी आणि पोलिस भरतीसाठी संगमनेरमध्ये अनोखे आंदोलन, प्रांत कार्यालयासमोर ठिय्या

Ration Distribution: रेशनधारकांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्ट ते ऑक्टोबरचे तीन महिन्यांचे धान्य एकाचवेळी मिळणार; वितरणात मोठा बदल

SCROLL FOR NEXT