Manas Garge from Kothrud has become friends with birds pune  
पुणे

पुण्याच्या मानसला पक्ष्यांचा लळा, घराच्या बाल्कनीतच भरवतोय घास!

जितेंद्र मैड

कोथरुड (पुणे) : घरातील छोट्या बाल्कनीत पक्ष्यांचा संवाद सुरु असतो. गोड मिठू मिठू आवाज करत पोपट येतो. आपण आल्याची खबर देत तो सावकाशपणे पुढ्यात पडलेल्या दाण्याचा आस्वाद घेतो. पाणी पिवून तृप्त होतो. चिमणी, मैना, साळुंखी, कबुतर आणि इतरही पक्षी येथे येतात आणि समाधान व्यक्त करुन जातात. एक घास चिऊचा, एक घास काऊचा ही गोष्ट लहानपणी ऐकलेल्या किशोरवयीन मानस गर्गेला पशुपक्ष्यांना घास भरवायची इच्छा होती. त्यासाठी त्याने कर्वेनगरच्या शाहू कॉलनीतील आपल्या घरच्या बाल्कनीतच व्यवस्था केली. मग काय पक्ष्यांबरोबर त्याचा संवाद सुरु झाला. आता तर पक्ष्यांशी मानसची छानच गट्टी जमली आहे.

''प्रत्येकाला एक निवारा हवा असतो. मग तो मानव असो वा पक्षी. कोरोना काळात उपजिविकेचे साधन बुडाले म्हणून मजुरांचे तांडे शेकडो किलोमीटर चालत जाताना पाहिले. त्यांचे झालेले हाल पाहून मानसला खुप दुःख झाले. माणूस संकटावर मार्ग काढत असतो, पण पक्षी कसा मार्ग काढत असतील. आपण जेव्हा एखादे झाड तोडतो, तेव्हा पक्ष्यांचे काय होत असेल या विचाराने तो अस्वस्थ झाला होता. त्याने आम्हाला पक्ष्यांसाठी निवारा बनवण्याची इच्छा व्यक्त केली. आम्ही त्याच्या भावना लक्षात घेवून लगेच होकार दिला.''
- महेश गर्गे, मानसचे वडील,
 
हृदयद्रावक : वडिलांनी शर्थीचे प्रयत्न करूनही मुलगा बुडाला

मानस गर्गे म्हणाला, ''पशुपक्ष्यांच्या गरजा अत्यंत कमी आहेत. साठवणूक करुन दुसऱ्याच्या वाट्याचे हिरावूनही घेत नाहीत. फक्त काही धान्याच्या दाण्याची आस, दाणे खावेत चोचीत मावतील तसे. थोडे पाणी प्यावे आणि मंजुळ आवाज करत भुर्रकन उडून जावं. आपण त्यांच्यासाठी थोडे केले तर काय हरकत आहे.''

 
संपादन : सुस्मिता वडतिले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT