चिंचवड - सफाई कर्मचाऱ्यांना मास्कचे केलेले वाटप. 
पुणे

Coronavirus : अनेकांची गावाकडे धाव; ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून भाडेवाढ

सकाळवृत्तसेवा

कोरोनामुळे शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर झाल्याने कामानिमित्त शहरात आलेले नागरिक आपल्या मूळ गावी परत जात आहेत. मागील दोन दिवसांत ही संख्या वाढल्याने खासगी प्रवासी वाहतूकदारांनी प्रवास भाड्यात मनमानी वाढ केली आहे.

खासगी ट्रॅव्हल्स नेहमीच्या तुलनेत दोनशे ते तीनशे रुपये जास्त भाडे आकारत आहेत. औरंगाबादचे ४०० रुपयांचे भाडे आता ६०० रुपयांवर गेले आहे. यासह नागपूरला जाण्यासाठी साधारण नेहमी नऊशे ते हजार रुपये आकारले जातात. त्यामध्ये आता दोनशे ते तीनशे रुपयांनी वाढ झाली आहे.

पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत कामानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. हे नागरिक उन्हाळ्यात मुलांच्या वार्षिक परीक्षा संपल्यानंतर अथवा दिवाळीच्या सुटीत आपल्या मूळ गावी जात असतात. मात्र, कोरोनाच्या धास्तीमुळे अनेकांनी थेट आपल्या मूळ गावी जाणे पसंत केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे खासगी बसला प्रवाशांची संख्या वाढली आहे. मागील दोन दिवसांत मराठवाडा, विदर्भ या भागातील मूळ गावी जाणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. एसटी, रेल्वेऐवजी खासगी ट्रॅव्हल्सने जाण्यास प्राधान्य दिले जात आहे. निगडी, टिळक चौक, भोसरीतील पीएमटी चौक यांसह कासारवाडी येथील ट्रॅव्हल्सच्या ऑफिसवर तिकीट बुकिंगसाठी गर्दी होत आहे. तर काही जणांनी गर्दीत जाणे टाळण्यासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग केले आहे.   

कुठे गेले ‘ते’ कार्यकर्ते?...
कोरोनाबाबत सगळीकडेच चर्चा सुरू आहे. इतके परदेशातून आले, इतक्‍यांना ॲडमिट केले. इतक्‍यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत; पण महापालिका व सरकारी यंत्रणा सोडली तर, जनजागृती करताना कोणीही दिसत नाही. अन्यवेळी शहरात मोठमोठे फ्लेक्‍स लावून जाहिरातबाजी किंवा चमकोगिरी करताना अनेक जण दिसतात. मग, कोरोनाबाबत का नाही? असा प्रश्‍न एका पोलिस अधिकाऱ्याच्या मनात आला आणि त्यांनी चक्क सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केली. ते अधिकारी म्हणजे भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात कार्यरत वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कुंटे. ते काय म्हणताय, ते त्यांच्याच शब्दांत...

‘नमस्कार मित्रांनो! थोडे स्पष्ट बोलणार आहे. कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या तर क्षमा करा. आज कोरोनाची चर्चा सगळीकडे चालू आहे. आपण झोपेतून उठल्यावर देवाचे नाव न घेता पहिले मोबाईल, टीव्ही चेक करतो. की, रात्री परत कुठे कोरोनाचा बाधित सापडला का?, किती आकडा झाला? असो! काल संध्याकाळी एका मेडिकलमध्ये जाण्याचा योग आला. साधारणतः १० मिनिटांत जवळपास १०-१५ सॅनिटायझर आणि पाच-सहा मास्क विकले गेले. आज त्यांची गरज आहे. म्हणून त्यांची विक्री होते आहे.

काही मेडिकलमध्ये तर जास्त दराने त्यांची विक्री झाली आहे. आणि त्यावर कार्यवाही पण झाली. मग, मला पडलेला एक प्रश्‍न कदाचित तुम्हालाही पडला असेल की, कुठे गेले ते धडाडीचे कार्यकर्ते, युवा नेते, भावी नगरसेवक, आधारस्तंभ, यशस्वी उद्योगपती, मार्गदर्शक, ‘बॉस’, ‘दादा’, ‘भाऊ’, ‘अप्पा’. दरवेळी प्रत्येक सणाच्या दिवशी चौकाचौकांत फ्लेक्‍स लावणारे. लोकांना शुभेच्छा देणारे. मग, आता ते मास्क व सॅनिटायझर वाटताना कुठेच का दिसत नाहीत? सध्या लोकांना त्याची गरज आहे. आणि कोरोनाच्या बाबतीत जनजागृतीसुद्धा होणे गरजेचे आहे. मग, का करत नाहीत. काही चुकीचे बोललो असेल तर माफ करा!’

सफाई कर्मचाऱ्यांना मास्क वाटप
चिंचवड येथील राष्ट्रतेज तरुण मंडळ व काळभोरनगर शिवसेना शाखा यांच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांना मास्कचे वाटप करण्यात आले. शिवप्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. पोलिस उपनिरीक्षक वैभव सोनवणे, गजानन चिंचवडे, योगेश बाबर, सल्लागार मधुकर बाबर, विभाग प्रमुख नाना काळभोर, राजेश वाबळे, प्रशांत मोहिते, प्रवीण शिंदे, नागेश गायकवाड, रियाज शेख उपस्थित होते.

गर्दीच्या ठिकाणी पालिकेकडून औषध फवारणी
शहरात संसर्गाच्या भीतीने ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आदेशावरून गर्दीच्या ठिकाणी औषध फवारणी केली जात आहे. शहरातील पोलिस आयुक्तालय, यशवंतराव चव्हाण रुग्णालय, चिंचवड पोलिस स्टेशन, भोसरी पोलिस स्टेशन, पिंपरी व चिंचवड भाजी मंडई परिसर, चिंचवड वाहतूक शाखा विभाग व धार्मिक स्थळे या ठिकाणी औषध फवारणी करून परिसराचे निर्जंतुकीकरण केले आहे. तसेच छोटी दुकाने, स्टोअर या ठिकाणीदेखील नागरिक पाण्याचे फवारे मारून परिसर स्वच्छ करत आहेत. सफाई कर्मचाऱ्यांची यामुळे चांगलीच धावपळ उडत आहे. काही ठिकाणी दिवसातून दोन ते तीन वेळा स्वच्छता मोहीम राबविली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेटचा देव 'सचिन' जेव्हा फुटबॉलचा सुपरस्टार मेस्सीला भेटला, 10 नंबरची जर्सी देताना काळ थांबला… वानखडेवरील 'तो' क्षण Viral

Latest Marathi News Live Update: स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी वानखेडे स्टेडियममधून रवाना

Baramati Politics:'बारामतीत राष्ट्रवादी व भाजपचे परस्परांवर आरोप प्रत्यारोप'; उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोरील आंदोलनाचे उमटले राजकीय पडसाद..

Google Search : रात्रीच्या वेळेस पुरुष गुगलवर सगळ्यात जास्त काय सर्च करतात? 2025 च्या नव्या रिपोर्टने दुनिया हादरली

Raju Shetti: शक्तीपीठ महामार्ग रेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा अटापिटा: राजू शेट्टींचा आरोप; टेंडरसाठी बड्या कंपन्यांकडून घेतला ॲडव्हान्स ?

SCROLL FOR NEXT