pune
pune sakal
पुणे

Maratha Protest : सकल मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला प्रतिसाद

बाबा तारे

औंध - .सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जालना जिल्ह्यातील आंदोलन पोलीस बळाचा वापर करून चिरडण्याचा केलेला प्रयत्न व मनोज जरांगे यांच्या आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी पुकारण्यात आलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

औंध,बाणेर , बालेवाडी,बोपोडी, पाषाण, सोमेश्वरवाडी,सुतारवाडी,सूस व महाळुंगे येथे मोठ्या प्रमाणावर बंदचा परिणाम जाणवला.मोठ्या प्रमाणात दुकाने, हॉटेल,शाळा,खाजगी आस्थापनांची कार्यालये व इतर व्यवसाय बंद ठेवण्यात आले होते.

त्यामुळे शुकशुकाट जाणवत होता.औंध येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दुचाकीवरून औंध, बाणेर फाटा, बाणेर गावठाण या मार्गावरुन रॅली काढण्यात आली.तसेच बाणेर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करुन बालेवाडी फाट्यापर्यंत शिस्तबद्ध व शांततेत पदयात्रा काढण्यात आली. बालेवाडी फाटा येथे सर्व गावातील रॅलीतून आलेले समाजबांधव एकत्र जमले होते.

तर यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करताना मराठा समाजाला आरक्षण मिळावे याचा पूनर्रुच्चार केला.तसेच सभेनंतर उपोषण करण्यात आले.या बंदला सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते,सामाजिक संघटना तसेच वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी लेखी पाठिंबा दर्शवला.

औंध व्यापारी संघटना, बाणेर बालेवाडी व्यापारी संघटना यांच्यासह इतर व्यावसायिकांनी पाठिंबा देत आपली दुकाने बंद ठेवली होती.काही अपवाद वगळता हा बंद कडकडीत पाळण्यात आला.तर चतु:शृंगी पोलीस ठाणे व हिंजवडी पोलीस ठाण्याच्या वतीने बंद पुकारलेल्या भागात कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

चतु:शृंगी पोलीस ठाण्याच्या वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या नेतृत्वाखाली १० अधिकारी व ५५ पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती .

चतु:शृंगी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब कोळी यांच्या नेतृत्वाखाली दोन अधिकारी,२५ पोलीस कर्मचारी व १५ वार्डन नियुक्त करण्यात आले होते.

हिंजवडी पोलीस ठाण्याच्या वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या नेतृत्वाखाली महाळुंगे सूस येथे बंदोबस्तासाठी तीन पोलिस निरीक्षक, दंगल नियंत्रण पथक व वीस पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते.

या आंदोलनादरम्यान मराठा समाजाच्या वतीने

खालील प्रमाणे मागण्या करण्यात आल्या.

मराठा समाजाला सरसकट 'मराठा कुणबी ओबीसी' जात प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारी अध्यादेश (जीआर) काढावा.

एखाद्या गावामध्ये मराठा समाजाच्या भावकीमध्ये ओबीसी प्रमाणपत्र असल्यास त्या आधारे त्या गावातील आडनावांच्या सर्वांना अर्ज प्रक्रियेद्वारे ओबीसी प्रमाणपत्र देण्यात यावे.

जालना येथील आंदोलनावर झालेल्या लाठीहल्ल्याची चौकशी करून संबंधितांचे कायमस्वरूपी निलंबन करण्यात यावे.

मराठा समाजासाठी स्थापन करण्यात आलेल्या सारथी संस्थेच्या निधीमध्ये व उपक्रमांमध्ये वाढ करण्यात यावी

जातीय जनगणना करण्यात यावी

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची कर्ज वाटप प्रक्रिया सहकारी बँका व पतसंस्था यांच्या माध्यमातून देखील करण्यात यावी.

बाणेर, बालेवाडी परिसरामध्ये येणाऱ्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल बांधण्यात यावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: Ram Naik: ९० वर्षांचे भाजप नेते राम नाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

IPL 2024: अखेर साखळी फेरीची सांगता झाली अन् दुसऱ्या क्रमांकाची रस्सीखेच हैदराबादानं जिंकली

SCROLL FOR NEXT