पुणे - मुंबई द्रुतगती मार्गाचे संग्रहित छायाचित्र.
पुणे - मुंबई द्रुतगती मार्गाचे संग्रहित छायाचित्र. 
पुणे

मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर मराठी अभिनेत्याला लुटले

सकाळ डिजिटल टीम

सोमाटणे (pune): मराठी अभिनेता योगेश सोहनी(yogesh Sahani) यास सोमाटणेजवळ (Somatane) धाक दाखवून अज्ञात चोरट्यांनी पन्नास हजाराला लुटले. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पिंजण यांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठी मालिकेतील अभिनेते योगेश माधव सोहनी (वय ३२, रा. मुंबई) हे आपल्या कारमधून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाने मुंबईहून पुण्याकडे जात असताना शनिवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास सोमाटणे उड्डाण पुलाजवळील बाह्यमार्ग येथे एका स्कॉर्पिओ चालकाने त्यांना हात दाखवून कार थांबविण्यास भाग पाडले. यावेळी या अज्ञात चालकाने योगेश सोहनी यांना धमकी देऊन तुझ्या गाडीने अपघात केला असून, यात एक जण जखमी झाला आहे. याबाबत आपण पोलिसांत तक्रार देणार असून, पोलिस तक्रारीतून वाचवण्यासाठी सव्वा लाख रुपये देण्याची मागणी केली. अखेर सोमाटणे येथील एटीएममधून पन्नास हजार रुपये काढून देण्यास भाग पाडले. पैसे हातात मिळताच संबंधित व्यक्ती तिच्या स्कॉर्पिओसह पसार झाली. या घटनेनंतर सोहनी यांनी पुण्याहून परत येताना सोमवारी (ता. १०) रोजी शिरगाव पोलिसात तक्रार दाखल केली.

शिरगाव पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सोमाटणे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरवात केली आहे. द्रुतगती मार्गावरील वाहनांची संख्या कमी झाल्याने चोरीचे प्रकार सुरु झालेत. हा प्रकार दिवसा व रहिवासी कॉलनी हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी घडल्याने महामार्ग पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले असून, त्यांनी याभागात गस्त वाढवली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: अक्षर पटेलने दिल्लीला मिळवून दिलं पहिलं यश; सुनील नारायण स्वस्तात बाद

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT