chitra
chitra 
पुणे

वालचंदनगरच्या शेकडो विद्यार्थ्यांनी घेतला चित्रकलेचा आनंद 

राजकुमार थोरात

वालचंदनगर : वालचंदनगर (ता.इंदापूर) येथे भारत चिल्ड्रन्स अॅकॅडमी शाळेतील ‘सकाळ’ चित्रकला स्पर्धेच्या परीक्षा केंद्रावर ५९९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.येथील शाळेमध्ये गेल्या ३१ वर्षांपासून स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून, हे स्पर्धेचे ३२ वे वर्ष आहे.

'सकाळ माध्यम समूहा'च्या वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन वालचंदनगर कंपनीचे मनुष्यबळ विभागाचे जनरल मॅनेजर आनंद नगरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळा समितीचे अध्यक्ष धीरज केसकर, उपाध्यक्ष पाडुरंग कवडे, शाळेचे प्राचार्य कृष्णदेव क्षीरसागर, 'सकाळ'चे वालचंदनगरचे बातमीदार राजकुमार थोरात उपस्थित होते.

चिमुकले विद्यार्थीही चिमुकल्या हातांनी चित्र रेखाटण्यामध्ये दंग झाले होते. स्पर्धेमध्ये इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील भारत चिल्ड्रेन्स अॅकॅडमी, वर्धमान विद्यालय, पाठशाळा, जंक्शनमधील नंदिकेश्‍वर विद्यालय, डॅफोडिल्स इंग्लिश मिडियम स्कूल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,लासुर्णेमधील पाटील वस्ती प्राथमिक शाळा, कुरवलीमधील कर्मयोगी शंकरराव पाटील विद्यालय, रणगावमधील रणगाव हायस्कूलमधील ५९९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

यावेळी नगरकर यांनी सांगितले, की 'सकाळ माध्यम समूह' सामाजिक बांधिलकी जोपासून विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे. जलसंधारणाची कामे केल्यामुळे जलस्त्रोत बळकट होण्यास मोलाची मदत झाली आहे. सकाळ चित्रकला स्पर्धेमुळे मुलांच्या कलागुणांना वाव मिळत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पार्वती बनसोडे व अमोल गोडसे यांनी आभार मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT