पुणे

आंध्रात आढळली पालीची नवी प्रजाती 

सकाळवृत्तसेवा

पुणे : पूर्वेकडील घाटातील महेंद्रगिरी पर्वतरांगांमधील उत्तर आंध्र प्रदेशात दगडावर आढळणाऱ्या पालीची नवी प्रजाती आढळली आहे. या घरात आढळणाऱ्या पालींच्या कुळाशी साधर्म्य असणाऱ्या या पालीला जीवशास्त्रज्ञ डॉ. सुशील कुमार दत्ता यांचे नाव दिले असून, ही पाल आता 'दत्ताज्‌ महेंद्रगिरी गेको' या नावाने ओळखली जाणार आहे. ही पाल जवळपास 20 सेंटिमीटर लांबीची आहे. 

रात्रीच्या वेळी बाहेर पडून आपले भक्ष्य शोधणारी ही पाल प्रामुख्याने दगडावर आढळून येते; तसेच मोठी झाडे आणि कॉफीच्या झाडाजवळ, समुद्रसपाटीपासून अडीचशे ते एक हजार 100 मीटर उंचीवर या पालीचा अधिवास आढळतो. महेंद्रगिरी पर्वतरांगांमध्ये नव्याने आढळलेली ही पाली दुसरी आणि पृष्ठवंशीय प्राण्यांची तिसरी प्रजाती आहे. 

पालीची ही नवी प्रजाती शोधण्यात भारतीय शास्त्रज्ञांबरोबरच परदेशी अभ्यासकांचा मोलाचा वाटा आहे. 'नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्स'मधील शास्त्रज्ञ डॉ. वरद गिरी, जबलपूर येथील झुलॉजीकल सर्व्हे ऑफ इंडियाचे डॉ. प्रत्युष मोहपात्रा, अमेरिकेतील विलानोवा विद्यापीठाचे ऍरॉन ब्रोएर, हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठाचे डॉ. चल्माला श्रीनिवासुलू, सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सचे ईशान अग्रवाल यांनी या पालीच्या नव्या प्रजातीवर आधारित शोधनिबंध तयार केला असून तो 'झुटेक्‍सा' या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे. 

डॉ. गिरी म्हणाले, ''महेंद्रगिरी पर्वतरांगांमध्ये गेल्या काही वर्षांपासून नवनवे जीव आढळून येत आहेत. या निमित्ताने या पर्वतरांगांमधील जैवविविधतेचे संवर्धन आणि संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित होत आहे. घरात आढळणाऱ्या पालीच्या प्रजातीशी संलग्न ही नवी पाल आहे. ओरिसा येथील जीवशास्त्रज्ञ डॉ. दत्ता यांनी सरपटणाऱ्या प्राण्यांवर संशोधन केले आहे; तसेच त्यांनी नव्या संशोधकांना नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. ही पाल यापूर्वी महाराष्ट्रातील उत्तर-पश्‍चिम भागात आढळणाऱ्या 'स्पॉटेड रॉक गेको' या प्रजातीतील एक म्हणून ओळखली जायची; परंतु या पालीचा शास्त्रीय अभ्यास केला असता, तिची गुणसूत्रे आणि काही खवले 'स्पॉटेड रॉक गेको'पेक्षा वेगळी आहे. 'स्पॉटेड रॉक गेको' आणि 'दत्ताज्‌ महेंद्रगिरी गेको' या दोन्ही प्रजाती एकमेकांपासून खूप भिन्न असल्याचे निदर्शनास आले आहे. या पालीचा रचनात्मक अभ्यासही तिचे वेगळेपण नमूद करतो.'' 

डॉ. दत्ता मोजक्‍या व्यक्तींपैकी एक 
उत्तर ओरिसा विद्यापीठातील प्रा. दत्ता हे काही वर्षांपासून 'स्कूल इन हर्पेटॉलॉजी' हा अभ्यासक्रम चालवीत होते. या अभ्यासक्रमात संपूर्ण भारतातून 25 विद्यार्थ्यांना निवडून त्यांना विनामूल्य शिक्षण दिले जात होते. या अभ्यासक्रमाद्वारे त्यांनी अनेक संशोधक घडविले आहेत; परंतु गेल्या दोन-तीन वर्षांपासून हा अभ्यासक्रम बंद आहे. त्यांनी अनेक जीवांचा नव्याने शोध लावला आहे. संशोधक म्हणून डॉ. दत्ता यांचे योगदान महत्त्वाचे आहेच; परंतु नव्या संशोधकांना प्रोत्साहन देणाऱ्या मोजक्‍या व्यक्तींपैकी प्रा. दत्ता हे एक आहेत, असे डॉ. गिरी यांनी आवर्जून नमूद केले. म्हणूनच डॉ. दत्ता यांचे नाव या पालीला देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल; ईव्हीएमची केली होती पूजा

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update: नरेंद्र मोदी अन् भाजपचा फोकस कोणत्याही किंमतीवर सत्ता मिळवण्यावर - सोनिया गांधी

Ajit Pawar: सोशल मीडिया त्याला चांगला जमतो; लहानपणापासूनच नौटंकी...; Viral Videoवरून अजितदादांचा रोहित पवारांवर निशाणा

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT