Bhigwan
Bhigwan 
पुणे

भिगवणमध्ये शिवजयंती उत्साहात

प्रशांत चवरे

भिगवण (पुणे) : भिगवण व परिसरामध्ये विविध सामाजिक संस्थांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. शिवजयंतीच्या निमित्त प्रतिमापूजन, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, मोटार सायकल रॅली कायर्क्रम आदी कार्यक्रम ठेवण्यात आले होते.  

येथील ग्रामपंचायत कायार्लयांमध्ये शिवजयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी सरपंच प्रशांत शेलार व अण्णासाहेब धवडे यांचे हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले. कार्यक्रमास सरपंच हेमा माडगे व उपसरपंच प्रदीप वाकसे, पंचायत समितीचे माजी सभापती रमेश जाधव, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अशोक शिंदे, शंकरराव गायकवाड, सचिन बोगावत व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. 

अखिल भारतीय मराठा महासंघ शाखा भिगवणच्या वतीनेही शिवजयंती साजरी करण्यात आली. सरपंच हेमाताई माडगे यांचे हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले. डॉ. जयप्रकाश खरड, एम.जी. जगताप, विकास वाघ, संजय चौधरी, राहुल जाचक, डॉ. संकेत मोरे, अशोक साळुंखे उपस्थित होते. महासंघाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त रक्तदान व नेत्रतपासणी व गरजुंना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन शाखाध्यक्ष राजुकमार मस्कर व उपाध्यक्ष अॅड. दिलीप गिरंजे यांनी केले. अमर बाैध्द युवक संघटनेच्या वतीने शिवजयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य विभागाचे सभापती प्रवीण माने यांचे हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले. सरपंच हेमाताई माडगे, निळकंठ राठोड, अॅड. महेश देवकाते, वंदना शेलार, अनिल काळंगे, सुनिल शेलार उपस्थित होते. स्वागत विक्रम शेलार यांनी केले तर संयोजन अमोल कांबळे यांनी केले.

येथील जाणता राजा मंडळ येथे आयोजित कार्यक्रमांमध्ये सरंपच हेमाताई माडगे, ग्रामपंचायत सदस्या वंदना शेलार, रेखाताई पाचांगणे यांचे हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन योगेश चव्हाण, गणेश जाधव, संतोष भालेराव, दादा चव्हाण, नितीन कदम यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. अजिंक्य माडगे मित्र मंडळाच्या वतीने आयोजित शिवजयंती कार्यक्रमात अहिल्यादेवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापुराव थोरात यांचे हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले. माजी सभापती रमेश जाधव, महेश शेंडगे, जावेद शेख, प्रसाद क्षीरसागर उपस्थित होते. संयोजन गणेश राक्षे यांनी केले. भिगवण स्टेशन येथील शिवरत्न प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. गुलामभाई शेख यांचे हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले. सहाय्यक पोलिस निरीक्षक निळकंठ राठोड, माजी सभापती रमेश जाधव व सरपंच हेमा माडगे, विठ्ठल मस्के, मनोज चव्हाण, अजिंक्य माडगे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT