market yard1.jpg
market yard1.jpg 
पुणे

Video : पुण्यातील मार्केट यार्ड तब्बल ५० दिवसांनंतर सुरू; पहिल्या दिवशी एवढ्या गाड्यांची आवक

सकाळवृत्तसेवा

मार्केट यार्ड (पुणे) : गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी, फळे, कांदा-बटाटा, केळी आणि पान विभाग रविवार (ता.३१) पासून सुरू झाला आहे. एक अडत्या एक वाहन या प्रमाणे बाजारात भाजीपाला, फळांच्या २०० गाड्यांची आवक झाली. या गाड्यांमधून ११ हजार क्विंटल शेत मालाची अवाक झाली असल्याचे बाजार समितीचे प्रशासक बी जे. देशमुख यांनी सांगितले. परंतु, नियमित बाजाराच्या तुलनेत आज अवघी पंधरा टक्केच आवक झाली.

रविवारी सकाळपर्यंत मुख्य बाजारात 200 गाड्यांमधून 11 हजार क्विंटल शेतमाल, मोशी, उत्तमनगर, खडकी आणि मांजरी या उपबाजारांमध्ये 4 हजार क्विंटल शेतमाल विक्रीसाठी दाखल झाला होता. मुख्य बाजार व उपबाजारात 471 गाड्यांमधून 15 हजार क्विंटल मालाची आवक झाली. मागील 50 दिवसांपासून बाजार बंद होता. त्यामुळे बाजार पूर्वपदावर येण्यास आणखी काही दिवस लागतील. त्यानंतर, आवक व मागणी वाढून भाव नियंत्रणात राहतील अशी माहिती बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली.

शहरातील महात्मा फुले मंडई आणि उपनगरांतील किरकोळ व आठवडे बाजार बंद आहेत. तसेच अनेक ठिकाणी खरेदीदारांना भाजीपाला, फळे ही पोहचं मिळत आहेत. तसेच बाजारातून खरेदी करणाऱ्या अनेक खरेदीदारांकडे बाजार समितीचा खरेदी परवाना नाही. त्यामुळे अनेक खरेदीदार बाजाराकडे फिरकले नाहीत. रविवार असून ही शेतमालाची आवक कमी होती. परंतु तरीही त्याला तुलनेने उठाव नसल्याचे चित्र बाजारात होते.

बाजारात सोशल डिस्टन्सिंग ठेऊन बाजारात सुरू झाला आहे. बाजार समितीचे कर्मचारी बाजारात योग्य ती खबरदारी घेऊन काम करत आहेत. पुढील काही दिवसांत बाजार पूर्वपदावर येईल. बाजारात हळू हळू अवाक वाढेल.
- बी. जे. देशमुख, प्रशासक, बाजार समिती.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा 


पहिला दिवस असल्याने गाड्यांची अवाक आज तुलनेने कमी झाली आहे. पुढील काही दिवसांत शेतमालाची अवाक वाढेल. तसेच मार्केट यार्ड सुरू झाल्याने भाजीपाला, फळांचे भाव नियंत्रणात येतील.
- अमोल घुले, उपाध्यक्ष, अडते असोसिएशन.

  • बाजारात शेत मालाची १५ टक्के अवाक
  • ग्राहक कमी असल्याने मागणी कमी
  • कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही यासाठी खबरदारी आणि उपाययोजना
  • मुख्य बाजार आणि उपबाजारात 471 गाड्यांमधून 15 हजार क्विंटल शेत मालाची अवाक
  • कोरोनाच्या भीतीने अनेक अडते बाजारात फिरकलेच नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT