murli.jpg 
पुणे

पुण्यात खासगी हॉस्पिटल व औषध दुकानांच्या बिलांबाबत महापौरांनी दिला 'हा' आदेश

सकाळवृत्तसेवा

पुणे : खासगी रुग्णालये व रुग्णालयातील औषध दुकानांकडून रूग्णांची लूट सुरू आहे. प्रशासन त्यांना नुसत्याच नोटिसा पाठविण्यापलिकडे कोणतीही कारवाई करीत नाही, असा आरोप करीत महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी विरोधकांनी गोंधळ घातला. अखेर त्याची दखल घेऊन महापौरांनी या प्रकरणी तपासणी करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले. 

सभेला सुरूवात होताच मनसेचे गटनेते वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांनी खासगी रूग्णातील औषधांच्या दुकानांवर कारवाई करावी, असे फलक हाती धरत महापौरांच्या आसनासमोर उभे घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. सर्व खासगी रुग्णालयांच्या विरोधात तक्रारी व पुरावे आहेत. रुग्णांच्या नातरवाईकांना वाढीव दराने औषधे खरेदी करायला लावली जात आहेत. नागरिकांकडून हजारो रुपयांची बिले वसूल केली जात असल्याचे मोरे यांनी निदर्शनास आणून दिले. 

पाठोपाठ कॉंग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी मागील तीन सभांमध्ये हा विषय मांडूनही त्याविषयी प्रशासनाकडून गांभीर्याने कारवाई केली जात नसल्याचे निदर्शनास आणून दिले. कोविडची औषधे काळ्या बाजारात विकली जात आहेत. त्यामुळे या विषयावर चर्चा झालीच पाहिजे, अशी मागणी लावून धरली. शहरातील परिस्थिती नियंत्रणात नाही. पुणेकरांना त्रास होत आहे. कम्युनिटी स्प्रेड झालाय हे प्रशासन का मान्य करीत नाही असा प्रश्न उपस्थित करीत जम्बो कोविड सेंटर तीन महिन्यांपूर्वीच का उभारले नाही यावरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. 

त्यावर सभागृह नेते धीरज घाटे यांनी "आम्ही नाही तर राज्य सरकारने उशीर केला आहे. महापालिका आपले काम करीत आहे' असे उत्तर दिले. त्यावरून राष्ट्रवादी, कॉंग्रेस, शिवसेना आणि मनसेच्या नगरसेवकांनी सत्ताधारी भाजपाला धारेवर धरत स्वतःचे अपयश "राज्य शासनावर खपवू नका' असे सुनावले. राष्ट्रवादीच्या गटनेत्या दीपाली धुमाळ, कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांच्यासह नगरसेवक महापौरांच्या आसनासमोर जमा झाले. 'चार महिने तुम्ही काय केले, तीनशे कोटी कशावर खर्च केले' याचा हिशोब मागण्यास विरोधी पक्षांनी केला. तेव्हा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मध्यस्ती करीत " राज्य शासन आणि पालिका या विषयावर बोलू नये. केवळ पुणे आणि कोरोना या विषयावर बोलूया. वसंत मोरे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर बोलूया, तीन सभांमध्ये हा विषय सुरू आहे. सर्वांची भावना सारखीच आहे.'' 

सभागृहातील वाढलेला गोंधळ पाहून महापौर मोहोळ यांनी खासगी रुग्णालये आणि औषध दुकानदारांकडून देण्यात येणाऱ्या बिलांचे पूर्व लेखापरीक्षण करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या. या प्रकरणांची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले.'' 

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

Jalna News : पाणी आणण्यासाठी डाव्या कालव्यावर गेलेल्या ऊसतोड मजुराच्या मुलीचा पाण्यात बुडुन मृत्यु; तीन दिवसांनंतर सापडला मृतदेह

SCROLL FOR NEXT