पुणे

व्यायामाने मिळवा पुन्हा मूळची जीवनशैली;कोरोनानंतरच्या त्रासाबाबत वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोना होऊन बरोबर दोन महिने झाले. पण, आजही दैनंदिन काम करतानाच नाही, तर घरातल्या घरात चालतानाही दम लागतो. थकवा येतो. या कोरोनानं माझं आयुष्यच बदललंय... वयाची ४५ वर्षे झालेल्या प्रख्यात माहिती तंत्रज्ञान कंपनीतील अभियंता बोलत होता.

लवकर निदान आणि प्रभावी उपचार हे कोरोनामुक्तीचे दोन प्रभावी मार्ग आहेत. पण, कोरोनामुक्त झाल्यानंतरही वेगवेगळ्या वयोगटातील नागरिकांना विविध प्रकारचे त्रास होत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवले आहे. कोरोनानंतर होणाऱ्या अशा त्रासांवर मात करण्यासाठी नियमित श्वसनाचे व्यायाम, स्नायूंची लवचिकता वाढविणारे व्यायाम प्रकार आणि फिजिओथेरपी आवश्‍यक असल्याचा सल्लाही  त्यांनी दिला. 

काही रुग्णांना कोणतीच लक्षणे नसताना त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली. पण, काही रुग्णांना त्याचा खूप त्रास झाला. यातून बरे होऊन, दोन-तीन महिने झाल्यानंतर थकवा येणे, काम करण्यात उत्साह न वाटणे, व्यायाम करताना दम लागणे किंवा उदासीनता अशा स्वरूपाच्या तक्रारी येत असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. 

असा ठेवा दिनक्रम

  • कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचे जीवनमान पूर्ववत होणे, हे अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक असते. त्यासाठी वेगवेगळे घटक महत्त्वाचे ठरतात
  •  कोरोनापूर्वीची शारीरिक सक्रियता
  •  पूर्वीचा आजार   मानसिक अवस्था
  •  कोरोना काळात रुग्णाची सक्रियता

कोणते विशिष्ट व्यायाम करावे
श्वसन संस्था सक्षम करणारे व्यायामांना रुग्णांनी प्राधान्य द्यावे. त्यासाठी श्वसनमार्गाच्या स्नायूंच्या बळकटीकरण आणि स्पिरोमेट्रीसह एक श्रेणीबद्ध व्यायामाचे वेळापत्रक अमलात आणावे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनानंतर ही काळजी घ्या

  • ऑक्‍सिजनची पातळी : कोरोनामुक्त झाल्यानंतर नियमित हलका व्यायाम करा. त्यातून रक्तातील ऑक्‍सिजनची पातळी पूर्ववत होईल.
  • रक्तदाब : काही रुग्णांमध्ये व्यायाम करताना रक्तदाब बदलण्याची शक्‍यता असते. अशा रुग्णांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करावा.
  • श्रम पातळी (बोर्गस्‌ स्केल) : श्रम पातळी पाहण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरलेला प्रमाणात एक क्‍लिनीशियन योग्य श्रम पातळीसाठी मूल्यांकन आणि मार्गदर्शन करेल. हे पूर्वी अस्तित्वात असलेल्या तंदुरुस्तीच्या पातळीवर आणि क्‍लिनिकल स्थितीवर व्यापकपणे अवलंबून असते.
  • नाडी दर : यासाठीसुद्धा जवळून देखरेखीची आवश्‍यकता आहे.

कोरोनातून बरे झालेल्या; मात्र त्यानंतर शारीरिक तक्रारी वाढलेल्या रुग्णांचे जीवन पूर्ववत करण्यासाठी त्यांच्या आरोग्याचा विचार करावा लागतो. त्यात हृदयविकार हा त्यातील महत्त्वाचा घटक असतो.
- डॉ. ऋतुपर्ण शिंदे, हृदयरोगतज्ज्ञ

कोरोनाचा हृदय 
आणि मेंदू अशा अवयवांवर नेमका कसा दुष्परिणाम झालाय, त्यावर बारकाईने लक्ष देण्याची आवश्‍यकता असते. अवयवांचे कार्य आणि त्यावर झालेले दुष्परिणामांचे नेमकेपणाने निदान करून, त्यावर बहुआयामी उपचाराची गरज निर्माण झाली आहे. 
- डॉ. आसावरी पागे, कार्डियाक फिजिओथेरपिस्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: येवला निवडणुकीत छगन भुजबळांचा दबदबा कायम, शिंदेंच्या उमेदवारांना लोळवलं

Kolhapur Local Body Election : कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील निकाल स्पष्ट; मुरगूडमध्ये मुश्रीफ गटाला धक्का, हातकणंगलेत काँग्रेसचा वरचष्मा

Solapur : स्ट्राँग रूमची चावी हरवली, शेवटी अधिकाऱ्यांनी कुलूप तोडलं; मतमोजणीला उशिरा सुरुवात

Latest Marathi News Live Update: उपचार सोडून उमेदवार थेट रुग्णवाहिकेतून मुलाखत द्यायला अजित पवारांकडे दाखल

Nagar Palika Result 2025 : उरणमध्ये अज्ञात व्यक्ती स्ट्राँग रुममध्ये घुसला, नाश्ता देण्याच्या बहाण्याने आला अन्... मतमोजणी केंद्रावर राडा

SCROLL FOR NEXT