पुणे : लष्करातील शॉर्ट सर्व्हिस कमिशनचे (एसएससीओ) सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना माजी सैनिक अंशदायी आरोग्य सेवा योजने अंतर्गत (इसीएचएस) वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. याबाबतच्या परिपत्रकात देण्यात आलेल्या निर्देशनांमुळे काही निवृत्त अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर काहींनी थोडे समाधानकारक असल्याचे सांगितले. निवृत्तीवेतन (पेंशन) मिळत असलेल्या अधिकारी व जवानांना 'माजी सैनिक' समजले जात होते. तर या श्रेणीत येत नसलेल्या अधिकारी व जवानांना इसीएचएसचा लाभ मिळत नवता. दरम्यान अशा प्रकारच्या सुविधा मिळविण्यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून एसएससी सेवानिवृत्त अधिकारी प्रयत्न करत होते. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार 2019 मध्ये याबाबत निर्णय घेण्यात आला होता. यामध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशनमधील निवृत्त अधिकारी, इमर्जन्सी कमिशनमधील सेवानिवृत्त अधिकारी (ईसीओ) तसेच, लष्करातील इतर काही वर्गातील माजी सैनिकांना इसीएचएस अंतर्गत लाभ देण्यात आले आहे. परंतु यातील निर्देशनानुसार माजी सैनिकांना केवळ इसीएचएस पॉलिक्लिनिक व त्यांच्या अंतर्गत नेमण्यात आलेल्या काही खाजगी रुग्णालयातच ही सुविधा मिळणार आहे. यामुळे काही निवृत्त अधिकाऱ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.
हेही वाचा - पुणे विद्यापीठातील विशेष प्राध्यापकांची नियुक्ती रद्द करा; कुलगुरूंकडे मागणी
शॉर्ट सर्व्हिस कमिशनमधील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना देखील हा लाभ मिळावा यासाठी कॅप्टन (निवृत्त) रमेश के भारद्वाज यांनी पुढाकार घेतला होता. गेल्या अनेक वर्षांपासून ते यासाठी प्रयत्न करत होते. याबाबत कॅप्टन (निवृत्त) भारद्वाज म्हणले, "मी स्वतः शॉर्ट सर्व्हिस कमिशन अधिकारी आहे. तसेच दहा वर्षांच्या सेवेनंतर आम्हाला देखील वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी यासाठी मी हा लढा लढला. परंतु अद्याप आम्हाला लष्करी रुग्णालयात उपचार सेवा मिळत नाही तसेच पूर्ण सुविधा उपलब्ध नाहीत. इसीएचएस मार्फत नेमण्यात आलेल्या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान आलेल्या खर्चाचा केवळ 50 टक्के परतावा मिळणार. दरम्यान या सर्व बाबींमध्ये पुन्हा बदल करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत."
'वन टाईम काँट्रिब्युशन' करून इसीएचएस स्मार्ट कार्डसाठी नोंदणी :
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी निवृत्त अधिकाऱ्यांनी व माजी सैनिकांना इसीएचएस विभागाचे सदस्यत्व मिळविणे अनिवार्य आहे. यासाठी विविध श्रेणीतील माजी सैनिकांना ठराविक रक्कम भरणे आवश्यक आहे. मात्र शहिदांच्या पत्नींना यामध्ये सूट देण्यात आली आहे. ही रक्कम जमा केल्या इसीएचएस कार्ड दिले जाईल. त्यामुळे देशातील विविध इसीएचएस पॉलिक्लिनिक तसेच इसीएचएस मार्फत नेमण्यात आलेल्या काही खाजगी रुग्णालयात औषध व उपचारची सुविधा घेता येणार आहे. अशी माहिती इसीएचएस सल्लागार समितीचे सदस्य रवींद्र पाठक यांनी दिली.
हेही वाचा - आरटीईच्या २५ टक्के जागांवरील प्रवेशाची सोडत बुधवारी होणार जाहीर
"निवृत्तिवेतन नसलेल्या माझी सैनिकांना खाजगी रुग्णालयात उपचार घेताना अनेक अडचणी येतात. अनेक आर्थिक अडचणी उद्भवतात. अश्यात हा निर्णय काही प्रमाणात समाधानकारक आहे. यामध्ये शॉट सर्व्हिस कमिशन अंतर्गत सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व त्यांच्या पत्नी किंवा पती यांनाच ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. इतर अवलंबितांना ही सुविधा नसेल. त्यामुळे हा निर्णय पूर्णतः हितकारक करण्यासाठी तसेच अवलंबितांना देखील सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करत आहोत."
- मेजर (निवृत्त) मिलिंद तुंगार
"शॉर्ट सर्व्हिस कमिशन मधील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना यापूर्वी ही सुविधा उपलब्ध नवती. मात्र या निर्णयामुळे आता देशातील विविध ठिकाणी असलेल्या इसीएचएसच्या पॉलिक्लिनिकमध्ये मोफत औषधोपचाराची सुविधा उपलब्ध झाली आहे. या निर्णयाचे स्वागत करतो."
- कर्नल (निवृत्त) विनायक तांबेकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.