bhama askhed 
पुणे

भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांसाठी उद्या महत्त्वाचा दिवस 

रुपेश बुट्टे

आंबेठाण (पुणे) : पालकमंत्र्यांसमवेत उद्या जरी मिटिंग असली, तरी आज काम बंद करावे आणि मग शेतकऱ्यांसमवेत मिटिंग करावी, असा सूर लावत खेड तालुक्यातील भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांनी पुणे जलवाहिनीचे काम काही वेळ बंद पाडले. आम्हाला अटक करा, नाहीतर काम बंद करा, अशी ठाम भूमिका प्रकल्पग्रस्तांनी मांडली होती. परंतु, आम्हाला काम बंद करण्याचा अधिकार नसल्याने आम्ही काम बंद करू शकत नाही, अशी ठाम भूमिका चाकण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रकाश धस यांनी घेतली. त्यामुळे उशिरापर्यंत आंदोलक ठाण मांडून बसले होते. अखेर उद्याच्या मिटिंगपर्यंत वाट पाहू, असे ठरवून आजचे आंदोलन मागे घेतले.

आज पुणे येथे जिल्हाधिकारी यांच्या समवेत काही प्रमुख शेतकऱ्यांची बैठक झाली. परंतु, या झालेल्या बैठकीत काही समाधानकारक तोडगा निघाला नाही आणि काम बंद करण्याची सूचना मिळाली नाही. त्यामुळे निराश झालेल्या शेतकऱ्यांनी काम बंद करण्याची मागणी करीत जलवाहिनी काम सुरू असणाऱ्या ठिकाणी ठिय्या मांडला. या वेळी सत्यवान नवले, देविदास बांदल, चांगदेव शिवेकर, रोहिदास गडदे, ज्योती कुदळे, गजानन कुडेकर, अण्णा देवाडे, स्वप्नील येवले, संतोष कावडे, गजानन कुडेकर, किसन नवले, गणेश जाधव, तुकाराम नवले, संदीप होले, शांताराम शिवेकर, नवनाथ शिवेकर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी माजी पंचायत समिती सदस्य रोहिदास गडदे यांनी आमदार मोहिते यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली. यात उद्याच्या मिटिंगपर्यंत वाट पाहू आणि तोडगा काढू, असे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलकांनी आजच्या दिवशी आंदोलन मागे घेतले.

मी प्रकल्पात पूर्णपणे भूमिहीन शेतकरी झालो आहे. त्याबद्दल पुनर्वसनात मला दोन वर्षांपूर्वी तीन एकर जमीन काळूस येथे मिळाली होती. त्याचा सातबारा झाला होता, परंतु आता शासनाने पुन्हा ही जमीन काढून घेतली आहे. 
 -  मारुती कोंडिबा मांढरे, 
प्रकल्पग्रस्त शेतकरी, पराळे (ता. खेड) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT