Temperature-less
Temperature-less 
पुणे

पुण्यात पारा घसरला; येत्या काही दिवसांत राज्यात थंडी आणखी वाढणार

सकाळवृत्तसेवा

पुणे - शहरातील गारठा वाढत आहे. गेल्या तीन दिवसांपासून किमान तापमानाचा पारा सातत्याने घसरत असल्याचे निरीक्षण हवामान खात्याने बुधवारी नोंदविले. पुण्यात किमान तापमान १५.१ अंश सेल्सिअस नोंदले गेले असून, पुढील दोन दिवसांमध्ये १५ ते १६ अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पुण्यात ३१ ऑक्‍टोबरला १५.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले होते. त्यानंतर किमान तापमानाचा पारा १८.८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढला. गेल्या तीन दिवसांमध्ये दोन अंश सेल्सिअसने तापमान कमी होऊन, ते बुधवारी सकाळी साडेआठ वाजता १५.१ अंश सेल्सिअस नोंदले गेले. पुढील दोन दिवसांमध्ये आकाश निरभ्र रहाणार आहे. त्याचवेळी कमाल तापमान ३१ आणि किमान १५ ते १६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. शहरातील आर्द्रतेचे प्रमाण ९३ टक्‍क्‍यांपर्यंत आहे. 

राज्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून गारठा वाढत असल्याने थंडीची चाहूल लागली आहे. राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये आता थंडीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होत आहे. येत्या काही दिवसांत राज्यात थंडी काही प्रमाणात वाढणार आहे. बुधवारी (ता. ४) सकाळी आठपर्यंत सर्वांत कमी तापमान चंद्रपूरमध्ये १२.२ अंश सेल्सिअसची नोंदले गेले.

राज्यातील किमान तापमान 
मुंबई २५, रत्नागिरी २२.५, डहाणू २३.५, पुणे १५.१, जळगाव १५.२, कोल्हापूर १९.४, मालेगाव १७.४, नाशिक १५.४, सांगली १८.३, सातारा १६.५, सोलापूर १६.४, औरंगाबाद १६.३, बीड १६.९, परभणी १४, नांदेड १७, अकोला १५.६, अमरावती १३, बुलडाणा १६.६, चंद्रपूर १२.२, गोंदिया १३.६, नागपूर १२.८, वर्धा १४.४.

राज्यातील हवामान अंदाज

  • हवामान खात्याच्या मराठवाडा उपविभागातील औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर येथे आणखी घट होण्याची शक्‍यता आहे. 
  • विदर्भात अमरावती, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, वाशीम या भागात जास्त थंड वारे वाहतील. त्यामुळे या भागातही अजूनही थंडी वाढण्याची शक्‍यता आहे. 
  • नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली येथे किमान तापमानात कमालीची घट होईल. 
  • कोकणात पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, उपनगर, ठाणे येथे थोड्या प्रमाणात थंडी वाढेल. 
  • पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, नगर या भागांमध्ये थंडीची तीव्रता वाढेल.
  • Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iraq: इराकमध्ये समलैंगिक संबंधाना गुन्हा ठरवणारा कायदा मंजूर; तब्बल इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास

Loksabha 2024: मतदानाचा घसरलेला टक्का कुणाच्या पथ्यावर? वाचा काय सांगतो लोकसभेचा इतिहास 

Latest Marathi News Live Update: किरकोळ बाजारात तूरदाळीचे दर दहा टक्क्यांनी वाढले

Hassan Sex Scandal: माजी पंतप्रधानांच्या नातवाच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

Sakal Podcast : सुळे विरुद्ध पवार, बारामती नेमकी कोणाची? ते कांदा निर्यातबंदी उठवली हा जुमलाच

SCROLL FOR NEXT