PNE18O19597.jpg
PNE18O19597.jpg 
पुणे

राज्य सरकारची मंजुरी न घेताच मेट्रो मार्ग बदलला

दिलीप कुऱ्हाडे

पुणे : भारतीय पुरातत्त्व विभागाने ‘आगाखान पॅलेस’ मुळे नगर रस्त्यावरील मेट्रो मार्गाला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे आता मेट्रो वनाझ ते रामवाडी व्हाया कल्याणीनगर धावणार आहे. त्यासाठी तब्बल दोनशे ते अडीचशे कोटी रूपयांचा जादा खर्च येणार आहे. मात्र ‘महामेट्रो’ ने या बदललेल्या मार्गासाठी महापालिका व राज्य सरकारची मंजुरी घेतली नाही.
 
वनाझ ते रामवाडी मार्ग पूर्वी येरवड्यातून सरळ नगर मार्गाने जाणार होता. मात्र भारतीय पुरातत्त्व विभागाने नगर रस्त्यावरील आगाखान पॅलेस ही ऐतिहासिक व पुरातत्त्व वास्तू असल्यामुळे येेथील मेट्रो मार्गाला परवानगी दिली नाही. त्यामुळे ‘महामेट्रोे’हा मार्ग नव्याने येरवडा ते थेट कल्याणीनगर- रामवाडी असा मार्ग आखला आहे. हा मार्ग मुळा-मुठा नदीकाठावरील डॉ. सालीम अली पक्षी अभयाण्यातून जातो. त्यामुळे अनेक वृक्ष तोडावे लागणार आहे. तर मेट्रो नगर रस्त्याने न गेल्यामुळे पूर्वीची गुंजन चौक, शास्त्री चौक, कल्याणीनगर कॉर्नर येथील वाहतूक कोंडी जैसे थे राहणार आहे. तसेच महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, नागपूरचाळ, शास्त्रीनगर शासकीय वसाहत आदी ठिकाणच्या रहिवाशांना मेट्रोचा लाभ होणार नाही. त्यांना मेट्रो पकडण्यासाठी येरवडा किंवा रामवाडी स्थानक गाठावे लागणार आहे. 

मेट्रोचा मार्गा बदलण्यासाठी आधी शहर सुधार समितीमध्ये ठराव संमत करावे लागेल. त्यानंतर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळाल्यानंतर ते राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविले जाईल. या सर्व मंजुरीसाठी बराच कालावधी लागणार आहे. असे असताना महामेट्रोने कोणतीही परवानगी नसताना बदललेल्या मेट्रो मार्गाची आखणी करून काम सुरू केले आहे. त्यामुळे भविष्यात मेट्रोच्या मार्गात अडथळे येऊ शकतात हे सांगण्याची तज्ज्ञांची गरज नाही. 

‘‘मेट्रोच्या बदललेल्या मार्गासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांची मंजुरी घेतली आहे. राज्य व केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी प्रयत्न सुरू आहेत.’’
- प्रकाश वाघमारे, प्रमुख प्रकल्प व्यवस्थापक, महामेट्रो 

‘‘महामेट्रो ने बदललेल्या मेट्रो मार्गाची मंजुरी महापालिकेच्या शहर सुधार समिती व सर्वसधारण समितीत घेणे अपेक्षित आहे. त्यानंतर हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी येईल. ही बाब महापालिका आयुक्त साैरभ राव यांच्या निदर्शनात आणून दिली आहे.’’
- डॉ. सिध्दार्थ धेंडे , उपमहापौर, पुणे महानगरपालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल; ईव्हीएमची केली होती पूजा

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update: नरेंद्र मोदी अन् भाजपचा फोकस कोणत्याही किंमतीवर सत्ता मिळवण्यावर - सोनिया गांधी

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT