mhada exams esakal
पुणे

औरंगाबादच्या क्लासचालकांकडे मिळाले म्हाडा भरतीचे रेट कार्ड

आरोग्य भरती परीक्षा पेपरफुटी प्रकरण

सकाळ वृत्तसेवा

पुणे : आरोग्य भरती परीक्षेत (Health department Recruitment) गट क आणि ड पदाच्या पेपरफुटी प्रकरणी औरंगाबाद (Aurangabad) येथून अटक (Arrest) करण्यात आलेल्या तीन क्लासचालकांच्या मोबाईलमध्ये म्हाडाच्या प्रत्येक पदासाठी किती पैसे घ्यायचे याचे रेट कार्ड सापडले आहे. भरतीचा रेट एका कागदावर लिहिण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणातून ही बाब पुढे आली आहे.

अजय नंदू चव्हाण (३२), अंकित संतोष चनखोरे (२३) आणि कृष्णा शिवाजी जाधव (३३) असे या क्लासचालकांची नावे आहेत. रेट कार्डमधील रक्कम पाहता आरोपींनी मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल केली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तीनही आरोपींचा औरंगाबाद येथे करिअर ॲकॅडमी चालविण्याचा व्यवसाय आहे. ॲकॅडमीचे नाव होण्यासाठी आरोग्य विभागाचा गट क व ड चा पेपर त्यांनी अवैधरीत्या मिळवला. त्यानंतर तो त्यांच्या ॲकॅडमीतील विद्यार्थ्यांना दिल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. त्यांनी एकूण किती विद्यार्थ्यांना पेपर दिला व किती जणांकडून पैसे घेतले याबाबत तपास करायचा आहे. त्यामुळे त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केला.

पुढील तपासासाठी न्यायालयाने त्यांना २२ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आरोग्य विभागातील तांत्रिक विभागाचा संचालक महेश बोटले याच्यासह एकूण १७ जणांना पुणे सायबर पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपी उद्धव नागरगोजे (वय ३६), डॉ. संदीप त्रिंबक जोगदंड (वय ३६), श्याम महादू मस्के (वय ३८, तिघेही रा. बीड), राजेंद्र पांडुरंग सानप (वय ५१, रा.उस्मानाबाद), महेश सत्यवान बोटले (वय ५३, रा.मुंबई) यांची पोलिस कोठडीच मुदत संपल्याने त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. जी. डोलारे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना पुढील तपासासाठी २० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

अनेक विद्यार्थ्यांची माहिती पोलिसांच्या हाती :

क्लासचालकांनी कोणाकडून, कसा व किती मोबदला देवून पेपर मिळाला याबाबत सखोल तपास केला जाणार आहे. आरोपींकडून जप्त इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे तांत्रिक विश्लेषण केले असता अनेक विद्यार्थ्यांची माहिती त्यात मिळून आली आहे. बोटले याने ड आणि क गटाचा पेपर फोडल्याची कबुली दिली असून त्याने पेपर किती जणांना दिला याबाबत तपास सुरू आहे. पेपर सेट करणाऱ्या समितीतील इतर सदस्य या प्रकरणात लाभार्थी आहेत का यासंदर्भातील चौकशी केली जाणार आहे, असे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये नमूद आहे. या गुन्ह्याचा तपास सायबर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक मीनल पाटील करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Alert: 60 किलोमीटरच्या वेगाने दिल्लीच्या दिशेने येतेय वादळ! 'नोएडा'सह लगतची शहरं अंधारात

Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना मोठी भेट! मुंबईतून पुन्हा धावणार ‘मोदी एक्स्प्रेस’; बुकिंग कधीपासून? पाहा संपूर्ण वेळापत्रक

Nepal Floods: हिमालय धोक्यात? नेपाळच्या महापुराने वाढवली भारताची चिंता! नेमकं काय घडतंय?

Bank Holiday: रक्षाबंधनला बँका बंद की सुरू? पाहा RBI काय सांगते

IND vs SL: फॉलोऑन देऊनही फसला प्लॅन! भारताच्या हातातून विजय निसटला, दिनूशा एकटा नडला; कोलंबो कसोटी 'ड्रॉ'

SCROLL FOR NEXT