MHADA 
पुणे

लॉकडाउनमुळे रखडली म्हाडाची 'लॉटरी'; पाहा कधी होणार सोडत!

अनिल सावळे

पुणे : गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) पुणे विभागाकडून म्हाडाच्या सुमारे 4 हजार 800 सदनिकांसाठी सोडत निघणार आहे. मात्र, परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत नागरिकांना म्हाडाच्या घरासाठी वाट पाहावी लागणार आहे. पुणे विभागातील पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली येथे 4 हजार 800 सदनिका उपलब्ध होणार आहेत. त्यापैकी सुमारे चार हजार सदनिका पुणे, पिंपरी चिंचवड परिसरात असतील.

म्हाडाच्या पुणे विभागाने पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील विविध ठिकाणी बांधलेल्या 2 हजार 190 सदनिकांसाठी गेल्या 13 सप्टेंबर रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानुसार 19 नोव्हेंबर रोजी ऑनलाइन सोडत काढण्यात आली. यामध्ये तळेगाव दाभाडे, म्हाळुंगे, चाकण तळेगाव, पिंपरी वाघिरे, धायरी, धानोरी, खराडी, येवलेवाडी, बिबवेवाडी, वाकड, चिखली अशा विविध भागात सदनिकांसाठी सोडत काढण्यात आली होती.

या सोडतीमध्ये अर्ज केलेल्या नागरीकांसाठी पुन्हा जानेवारी महिन्यात सोडत काढण्यात येणार होती. परंतु मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे कार्यालयात कर्मचाऱ्यांची पुरेशा प्रमाणात उपस्थिती नाही. त्याचा परिणाम म्हाडाच्या सदनिकांच्या ऑनलाईन सोडतीवर झाला आहे.

दरम्यान, सुमारे अकरा महिन्यांपासून म्हाडाची सोडत न झाल्यामुळे यापुढे उपलब्ध होणाऱ्या सदनिकांमध्ये वाढ होईल, अशी शक्यता आहे. लॉकडाऊनचा परिणाम बांधकाम क्षेत्रावर झाल्यामुळे म्हाडाला उपलब्ध होणाऱ्या सदनिकांवरही परिणाम होणार असल्याचे म्हाडाकडून सांगण्यात आले.

कोरोना प्रादुर्भावामुळे बांधकाम क्षेत्रावर परिणाम झाला आहे. तसेच, कार्यालयीन कामकाजही पूर्ण क्षमतेने होत नाही. परिस्थिती सामान्य झाल्यानंतर ऑनलाइन सोडत प्रक्रियेला किमान एक महिन्याचा कालावधी लागेल. त्यानंतर म्हाडाकडून ऑनलाईन सोडत काढण्यात येईल.
- अशोक पाटील, मुख्य अधिकारी, म्हाडा, पुणे

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT