Pune Cirme Esakal
पुणे

Pune Cirme: मध्यरात्री थेट घरात घुसला अन् तीन गोळ्या झाडल्या; पुण्यात मध्यरात्री खुनाचा थरार; परिसरात खळबळ

अज्ञात व्यक्तिने घरात घुसून एका व्यक्तीवर गोळ्या झाडल्या, या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं पुणे शहर हादरलं आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. शहरात एकीकडे पोलीस गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत असताना दुसरीकडे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात काल (रविवारी) मध्यरात्री गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या गोळीबाराच्या घटनात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अमित साहू असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.

शहरातील खडक परिसरातील सिंहगड गॅरेज चौकात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं निर्माण झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अमित साहू याचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.

गोळीबाराच्या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार अमित साहू हा पुण्यातील खडक परिसरात राहतो. रविवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी घरात घुसून त्याच्यावर गोळीबार केला. यामध्ये साहू याचा मृत्यू झाला.

स्थानिकांनी संबधित घटनेची माहिती पोलिसांना कळवली. माहिती मिळताच खडक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी फरार झाले असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत अनिल साहू मध्यरात्रीच्या सुमारास गाढ झोपेत होता, त्या वेळी एक अज्ञात व्यक्ती तिथे आली आणि घरात शिरुन त्या व्यक्तीनं अनिल साहूवर एकापाठोपाठ एक तीन गोळ्या झाडल्या. अज्ञात व्यक्तीनं गोळ्या झाडल्या त्यावेळी अनिल साहूचे कुटुंबातील इतर सदस्य घरातच होते. अज्ञाताने गोळ्या झाडल्या आणि तो पळून गेला.

तातडीने अनिल साहू याला रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी अनिल साहू यांनी तपासलं पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. दुर्दैवानं अज्ञात हल्लेखोरांनी झाडलेल्या गोळ्यांमुळे अनिल साहुचा आधीच मृत्यू झाला होता.

घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना कळवण्यात आली. पोलिसांनी माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल होत, तपास सुरू केला. याप्रकरणी आता पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच, पोलिसांकडून तपासची सूत्र वेगानं हलवली जात असून फरार आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : दिल्लीतील मद्य घोटाळ्याच्या आरोपातून निर्दोष मुक्ततेनंतर अरविंद केजरीवाल यांना अश्रू अनावर; म्हणाले- सत्याचाच विजय झाला

Satej Patil Hasan Mushrif Vinay Kore Alliance : सतेज पाटील, मुश्रीफ, विनय कोरे एकत्र येणार?, झेडपीतील पाडापाडीमुळे ‘गोकुळ’च्या राजकारणाला उकळी

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये ४०० कोटींच्या कथित अपहरण प्रकरणात मोठी घडामोड

प्रतीक्षा संपली ! स्टार प्लसचा बहुप्रतीक्षित शो "तारा" १० मार्चपासून रात्री ८ वाजता येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

Ramdas Athawale: मोदींचा सामना करणे ‘बच्चों का खेल नहीं’; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा राहुल गांधी यांना चिमटा

SCROLL FOR NEXT