पुणे

प्रवाशांनो, 1 ऑक्टोबरपासून एसटीसाठी शिवाजीनगरला जाऊ नका

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे- मुंबई रस्त्यावरील मुळा रस्त्यावर शिवाजीनगर एसटी स्थानकासाठीच्या कामाने वेग घेतला आहे. १ ऑक्‍टोबरपासून नव्या जागेवर शिवाजीनगर एसटी स्थानक कार्यान्वित होण्याची चिन्हे आहेत. मेट्रोमुळे या स्थानकाचे स्थलांतर करण्यात येणार आहे.

शिवाजीनगर एसटी स्थानकाच्या आवारात मेट्रो मार्गासाठी भुयारी स्थानक होणार आहे. आता स्थानकाचा ताबा घेऊन काम सुरू करायचे आहे. गेल्या महिन्यापासून परिसरात वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. मुळा रस्त्यावर वाकडेवाडीजवळ आरे डेअरीची सुमारे ५ एकर जागा एसटी स्थानकासाठी भाडेतत्त्वावर महामेट्रोला उपलब्ध झाली आहे. त्यातील अडीच एकर जागेवर सध्या स्थानकासाठी काम वेगाने सुरू आहे.  त्याअंतर्गत प्रवाशांना उभे राहण्यासाठी आणि बसण्यासाठी शेड, अधिकाऱ्यांसाठी केबिन, कर्मचाऱ्यांसाठी विश्रामगृह, उपाहारगृह, स्वच्छतागृहे आदींची कामे सुरू झाली आहेत. येत्या ३० सप्टेंबरपर्यंत ही कामे होतील, अशी अपेक्षा महामेट्रोचे मुख्य प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ यांनी व्यक्त केली. 

याबाबत एसटीच्या शिवाजीनगर आगाराचे प्रमुख अनिल भिसे म्हणाले, ‘‘नव्या जागेवर प्रवाशांची गैरसोय होऊ नये, याबाबत दक्षता घेण्याची सूचना महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना केली आहे. तसेच, स्थानक म्हणून कोणत्या सुविधा हव्या आहेत, याबाबतचा आराखडा महामेट्रोकडे सुपूर्द करण्यात आला आहे. त्यानुसार सुविधा मिळाल्यावर स्थलांतराबाबतची प्रक्रिया सुरू होईल.’’ शिवाजीनगर स्थानकात सध्या डिझेल पंप आहे. नव्या स्थानकात पंप नसेल. त्यामुळे एसटी बसला डिझेल भरण्यासाठी शंकरशेठ रस्त्यावरील पंपावर जावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT