Milk
Milk 
पुणे

पुणेकरांनो, शहरातील दूध पुरवठ्याबाबत आलंय महत्त्वाचं अपडेट; वाचा सविस्तर बातमी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात शनिवारी (ता.१) दूध दरवाढीच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनाचा खासगी आणि सहकारी दूध संघांच्या नियमित संकलनावर काहीही परिणाम झालेला नाही. शनिवारी नेहमीप्रमाणे दूध संकलन पूर्ण झालेले आहे. त्यामुळे पुणे शहरात नेहमीप्रमाणे रविवारी (ता.२) पूर्ववत दूध पुरवठा होणार आहे. दूधाचा कसलाही तुटवडा जाणवणार नसल्याचे महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे सचिव प्रकाश कुतवळ यांनी शनिवारी सांगितले.

राज्यातील सहकारी तसेच खासगी दूध उत्पादक संघांचा या राज्य कल्याणकारी दूध संघात समावेश आहे. आंदोलनकर्त्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन केले. काही ठिकाणी प्रतिनिधिक स्वरुपात दूध रस्त्यावर ओतले, पण फार नासधूस केली नाही किंवा शेतकऱ्यांची दूध विक्रीही रोखली नाही. शिवाय कोणत्याही दूध संघांनाही दूध संकलन करण्यास अडचण निर्माण केली नाही. यामुळे शनिवारी आंदोलन असूनही नेहमीप्रमाणे दूध संकलन पूर्ण झालेले असल्याचेही कुतवळ यांनी स्पष्ट केले. 

शनिवारीच्या दूध दरवाढ आंदोलनामुळे दूध संकलनात अडथळे निर्माण होण्याची शक्यता होती. यानुसार अडथळे निर्माण झाले असते, तर रविवारी शहरात तुटवडा जाणवेल, असा प्राथमिक अंदाज शुक्रवारी (ता.३१) दूध संघांनी वर्तविला होता. तो अंदाज सपशेल खोटा ठरला आहे. 

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला प्रतिलिटर ३० रुपये दर मिळावा, या मागणीसाठी भाजपप्रणीत महायुतीच्यावतीने राज्यव्यापी दूध दरवाढ आंदोलन करण्यात आले. 

साधारणतः शहरात दुसऱ्या दिवशी वितरित केले जाणारे दूध आदल्या दिवशीच संकलीत केले जाते आणि मध्यरात्रीपासूनच ते वितरित करण्यात येते. त्यानुसार आजही ही प्रक्रिया सुरळीत पार पडली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT