पुणे

Vidhan Sabha 2019 : एमआयएमला हव्यात पुण्यातील 'या' तीन जागा

ज्ञानेश्वर बिजले

पुणे ः पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी तीन जागांची मागणी एमआयएमने वंचित बहुजन आघाडीकडे केली आहे. हडपसर, वडगावशेरी आणि पुणे कॅन्टोन्मेंट या तीन विधानसभा मतदारसंघातून एमआयएमने निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे.

विधानसभेसाठी महाराष्ट्रात एमआयएमला हव्यात एवढ्या जागा

पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ हा अनुसूचित जाती साठी आरक्षित असून, तेथून भाजपचे माजी समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे प्रतिनिधीत्व करीत आहेत. या मतदारसंघांत मुस्लीम समाजांचे मतदारही मोठ्या संख्येने आहेत. त्याचबरोबर हडपसर मतदारसंघातील कोंढवा परिसरातही मुस्लीम समाजाची संख्या लक्षणीय आहे. या दोन्ही मतदारसंघांत लढत दिल्यास, आगामी महापालिकेच्या निवडणुकीतही त्याचा फायदा होणार आहे.

राष्ट्रवादीसोबत 70 टक्के जागांवर सहमत

वंचित बहुजन आघाडीचीही पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी आहे. त्यामुळे आघाडीकडून काय प्रतिसाद मिळतो, त्याकडे एमआयएमचे लक्ष लागले आहे. भाजप-शिवसेना युती झाल्यास, त्यांच्याकडेही रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनी पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाची मागणी केली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील लढत चुरशीची होण्याची शक्‍यता आहे.

एमआयएमने औरंगाबाद, मुंबई याबरोबरच पुण्यात पक्ष बांधणीकडे लक्ष दिले असून, त्यामुळेच तीन जागा लढविण्याची तयारी त्यांनी केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडून त्याबाबत प्रतिसाद मिळाल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटप निश्‍चित होईल, असे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी "ई सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT