minior girl was forced for marriage in Pune case filed  
पुणे

पुणे : अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने लावला विवाह; गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

हडपसर : फुरसुंगी येथे चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिल्याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा तपासासाठी दाखल झाला आहे. पोलिसांनी बालविवाह प्रतिंबध कायदयानुसार गुन्हा दाखल केला असून ही घटना २ डिसेंबर रोजी घडली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

याप्रकरणी राजू गुलाब सरोदे, अंजना गुलाब सरोदे (दोघे रा, सोमाटणे, ता. मावळ, जि. पुणे), जिवन पाटील, सागर गायकवाड (दोघेही रा. लाडेगाव, ता. वाळवा, जि. सांगली) व सुनिता (पूर्ण नाव माहित नाही) आणि लग्न लाऊन दिलेल्या भटजी या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी करिश्मा रामचंद्र कांबळे (वय २४, रा. सोमाटणे, ता. मावळ जि. पुणे) यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हा हडपसर पोलिस ठाण्यात घडल्याने पुढील तपासासाठी हडपसर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

पाच वर्षानंतर पुन्हा जळाला संसार; पुण्यातील महिलेची करुण कहाणी

हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक रघूनाथ जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणातील आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. ते फिर्यादी कांबळे यांचा मावसभाउ राजू सरोदे यांच्या घरी पाहूणे म्हणून आले. मुलीचे वडील व्यसनाधीन आहेत. पाहूण्यांसोबत मुलीसह तिचे वडील फुरसुंगी येथे सुनिता यांच्या घरी आले. त्यानंतर २ डिसेंबरला फ्लॅटमध्ये फिर्यादीच्या अल्पवयीन भाचीचे बळजबरीने लग्न लावून दिले.

महाविकासआघाडीच्या सरकरमध्ये विनायक मेटेंना मिळाली 'ही' संधी

लग्न लागण्याच्या पूर्वी अल्पवयीन मुलीने माझे लग्न सागर गायकवाड याच्याशी लावून देणार असून भटजी आणण्यासाठी ते गेले असल्याचे फोन करून कांबळे यांना सांगितले. मात्र कांबळे यांना हडपसरमध्ये येण्यास उशीर झाल्यामुळे त्या लग्न रोखू शकल्या नाहीत. त्यानंतर कांबळे यांनी तळेगाव पोलिस ठाण्यात याबाबत माहिती दिली. त्यानंतर सांगली येथील कुरळप पोलिस ठाण्याशी तळेगाव पोलिसांनी संपर्क साधला व मुलीला ताब्यात घेण्यास सांगितले. त्यानंतर अल्पवयीन मुलीला पोलिसांनी ताब्यात घेवून कांबळे यांच्या स्वाधीन केले. त्यानंतर तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात बालविवाह प्रतिबंध कायदया अंतर्गत गुन्हा दाखल केला. घटना हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असल्याने हा गुन्हा पुढील तपासासाठी हडपसर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Mundhwa land Case: मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानीला अखेर अटक; अमेडिया कंपनीसोबत व्यवहार झाल्याचं उघड

Latest Marathi News Live Update : रांजणी ते तुळजापूर पायी पालखी, 400 वर्षांची परंपरा आजही दिमाखात!

Sangli News : कडाक्याची थंडीही रोखू शकली नाही शिराळकरांना; दुपारपर्यंत तब्बल ६६.७३% मतदानाची नोंद

T20I World Cup 2026 साठी भारताच्या नव्या जर्सीचे झाले अनावरण; ब्रँड अँबेसिडर रोहित शर्माचीही उपस्थिती; पाहा Video

Horoscope Prediction : येत्या चार दिवसांमध्ये पालटणार 3 राशींचं नशीब ! शनी देवांच्या कृपेने घरात येणार पैसा

SCROLL FOR NEXT