पुणे : राज्यातील नाट्यगृहे कधी सुरू होणार अशा विचारणा सातत्याने सुरू आहे. पण राज्य सरकारची यावर ठाम भूमिका नाही. यासंबंधी कलाक्षेत्र सरकारकडे पाठपुरावा करीत असतानाच आता सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी नाट्यगृहात येण्याची तयारी दाखविली असून, नाट्यनिर्माता आणि कलावंतांच्या प्रश्नी नाट्यगृहात बैठक घेण्याची त्यांनी तयारी दाखविली आहे.
राज्यात अनलॉक सुरू झाल्यापासून अर्थचक्राला गती मिळावी, यासाठी सुरक्षेची नियमावली (एसओपी) तयार करून विविध व्यवसायांना सुरू करण्यास परवानगी दिलीय. त्यानुसार नाट्यगृहे आणि नाटकाचे प्रयोगास परवानगी द्यावी, यासाठी 'मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघ-मुंबई'ने नाट्य व्यवसायाशी संबंधित घटक संस्थाची सहमती घेऊन राज्य शासनाला 15 सप्टेंबर रोजी 'नमुना सुरक्षा नियमावली' सादर केली. तसेच, नाट्य व्यवसायाला आवश्यक उभारी देण्यासाठी सहाय्य व अर्थसहाय्यासाठीचे मागणी पत्र सादर केले होते.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
संघाच्या पदाधिकाऱ्यांनी त्याअनुषंगाने मंत्रालयातील कार्यालयात देशमुख यांची भेट घेतली. बैठकीत 'नाट्य निर्माता संघा'चे अध्यक्ष संतोष काणेकर, उपाध्यक्ष ज्ञानेश महाराव, प्रमुख कार्यवाह राहुल भंडारे आणि 'अ.भा.मराठी नाट्य परिषद'चे अध्यक्ष प्रसाद कांबळी उपस्थित होते. सांस्कृतिक कार्य विभागाचे मुख्य सचिव सौरभ विजय हेही यावेळी उपस्थित होते.
काणेकर यांनी 'नाट्य निर्माता संघा'चे 'नाट्यगृह सुरक्षा नियमावली'चे निवेदन आणि अर्थसहाय्य मागणी पत्र सांस्कृतिक मंत्र्यांपुढे पुन्हा सादर केले. ते वाचून या दोन्ही बाबत शासन सकारात्मक विचार करेल, अन्य विभागांशी चर्चा करून निर्णय घेईल,' असे सांगितले. तसेच या नियमावलीतील मुद्दे लक्षात घेऊन सांस्कृतिक कार्य सचिवांना शासकीय सुरक्षा नियमावली तयार करण्याचे सुरू करण्याची सूचना देशमुख यांनी केली आहे.
शासकीय नियमावली तयार करताना 'मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघ-मुंबई' आणि 'अ.भा.मराठी नाट्य परिषद' यांचा सहभाग राहील. त्यासाठी लवकरच बैठक बोलण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिल्याचे काणेकर यांनी सांगितले.
आता लॉयब्ररी देखील ऑनलाईन; विद्यार्थ्यांनो घरबसल्या करा अभ्यास
नाट्य कलावंत संघ, रंगमच कामगार संघटना, नाट्य व्यवस्थापक संघ या घटक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक कोरोना-सुरक्षा व्यवस्थेच्या सोयीसाठी 'यशवंतराव चव्हाण नाट्यगृह'मध्ये व्हावी, अशी विनंती प्रसाद कांबळी यांनी केली. ती मत्र्यांनी तात्काळ मान्य करून पंधरा दिवसांत बैठक घेऊ, असे सांगितले.
नाट्यगृहे सुरू करण्याबाबत शासकीय पातळीवर कोणताही निर्णय झाला नसताना, ते सुरू होत असल्याच्या जाहिराती माध्यमे आणि सोशल मिडियातून केल्या जात आहेत. यातून कलावंत व रंगमंच कामगार यांची दिशाभूल केली जाते. त्याला अटकाव करणारी भूमिका आपण जाहीर करावी, अशी विनंती काणेकर यांनी केली. त्यावर बोलताना प्रकाराबाबत देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच सरकारी भूमिका जाहीर करू असे आश्वासन दिले.
कुरकुंभमध्ये केमिकल कंपनीत भीषण आग; लागोपाठ स्फोटांनी परिसर हादरला
''अनुदान पात्र नाटकांचे रखडलेल्या धनादेशांबाबत कार्यवाही करावी, या मुद्द्यावरही सविस्तर चर्चा झाली. त्यावर कार्यवाही सुरू असून, या प्रकरणी लक्ष घालणार असल्याचा शब्द मंत्र्यांनी दिला आहे.''
- राहुल भंडारे (प्रमुख कार्यवाह, नाट्य निर्माता संघ)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.