taljai hill.jpg 
पुणे

पुणेकरांनो, तळजाईवर फिरायला जायचयं? मग 'ही' बातमी वाचा

सकाळवृत्तसेवा

सहकारनगर (पुणे) : लॉकडाउनचा पाचवा टप्पा सुरू असतानाच पाचगाव पर्वती वनविभाग मधील तळजाई टेकडीची सोमवारी सायंकाळी वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे पाहणी केली. यावेळी त्यांनी येत्या काही दिवसात पाचगाव पर्वती खुली केली तर फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये सोशल डिस्टन्स ठेवावा कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी येग्य ती खबरदारी घ्यावी अशी सूचना केली.

पावसाळा लवकर सुरू होणार आहे, या पार्श्वभूमीवर तळजाई टेकडीवरील सोयी सुविधांची आणि नव्याने लागवड केलेल्या झाडांची पाहणी भरणे यांनी केली. तळजाई टेकडीवर मागील वर्षी झाडांची लागवड करण्यात आली होती. उन्हाळ्यात झाडांची निगा कशी राखली गेली, झाडांना पुरेसा पाणीपुरवठा झाला का, झाडांचे संवर्धन योग्य होते का? आदी गोष्टींची चौकशी मंत्री भरणे यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे केली. भविष्यात येत्या काही दिवसात पाचगाव पर्वती खुली केली तर फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये सोशल डिस्टन्स ठेवावा, नागरिकांची गर्दी होऊ नये. झाडांची निगा राखणे  तसेच कोणत्याही परिस्थितीत करोनाचा संसर्ग टाळावा, अशी सूचना भरणे यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिल्या आणि लागवड केलेल्या झाडांची वाढ चांगली झाल्याने उन्हाळ्यात ही झाडे हिरवीगार असल्याने वन विभागाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.

यावेळी वन परिक्षेत्र अधिकारी दीपक पवार म्हणाले, पाचगाव पर्वती वनविभाग तळजाई टेकडीवर मागील वर्षी पंधरा हजार देशी वृक्षांची लागवड करण्यात आली असून वड, पिंपळ, जांभूळ, खैर, आवळा अशा प्रकारच्या देशी झाडांची लागवड केली असून दहा ते बारा फूट उंच झाडे झाली आहेत. लॉकडाउनच्या काळात ही झाडांची निगा व देखभाल करण्यात येत असून उन्हाळ्यात ही झाडांना योग्य पाणी दिल्याने झाडांचे चांगले सवर्धन झाले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पाचगाव पर्वती तळजाई टेकडी खुली करण्याबाबत महाराष्ट्र वन विभागाच्या सूचना अद्याप आल्या नसल्याने सरकारच्या सूचना येईपर्यंत वन विभाग बंद ठेवण्यात येणार आहे. जो पर्यंत सरकारचा आदेश येत नाही तोपर्यंत फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी प्रवेश बंद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT