beating Sakal
पुणे

पुणे : कबुतर चोरल्याच्या संशयावरून अल्पवयीन मुलाला जबर मारहाण

हा सर्व प्रकार मारहाण करणाऱ्या मुलांनीच सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

पुणे : कबुतर चोरल्याच्या संशयावरून अल्पवयीन मुलाला बॅट आणि पट्ट्याने जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धक्कादायक प्रकार म्हणजे हा सर्व प्रकार मारहाण करणाऱ्या मुलांनीच सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. पुण्यातील येरवडा परिसरामध्ये ही घटना घडली असून, याबाबत येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (Minor Child Beaten Due To Stolen Pigeon In Pune)

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या येरवडा परिसरात असलेल्या औद्योगिक शाळेमध्ये अल्पवयीन मुलगा खेळण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्या ठिकाणी या मुलाचे दोन अल्पवयीन मित्र दाखल झाले. त्यानंतर त्यांनी तु आमचे कबुतर चोरले आहे असे म्हणत अल्पवयीन मुलाला बेल्ट आणि पट्ट्याने नग्न करून मारहाण केली. या मुलाला मारहाण होत असताना इतर मुले हा प्रकार पाहत होते. मात्र, कुणीही सोडण्यासाठी कुणीही गेले नाही.

मारहाण झाल्यानंतर पीडित मुलाने घरच्यांना याबाबत काहीच सांगितले नाही. परंतु, ज्यावेळी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्या त्यानंतर हा सर्व प्रकार घरच्यांच्या समोर आला असता याबाबत त्यांनी पीडित मुलाकडे विचारणा करत पोलीसात तक्रर दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT