Pune_Police 
पुणे

...आणि वाट चुकलेलं दोन वर्षांचं बाळ आईच्या कुशीत विसावलं!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : रविवारी दुपारी दोन वाजताची वेळ. नाना पेठेत एक दोन वर्षांचे लहान मुल मोठमोठ्याने रडत आणि काहीतरी शोधत असल्याचे एका महिलेला दिसले. तिने त्या मुलाला घेऊन नाना पेठ पोलिस चौकी गाठली. आता मुलाचे रडणे वाढले होते, त्याचे बोबडे बोल पोलिसांनाही कळेना.

अखेर पोलिसांनी व्हॉटस्‌अप ग्रुपवर बाळाचे फोटे पाठवून, बीट मार्शलने वेगवेगळ्या ठिकाणी फिरून मुलाच्या पालकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रस्त्याच्याकडेला एक महिला रडत असल्याचे पाहून पोलिसांनी तिची विचारपूस केली. तेव्हा, तिने आपले मूल हरवल्याचे पोलिसांना सांगितले. महिलेला पोलिस ठाण्याला नेण्यात आले. तेव्हा आईला पाहून क्षणात तिच्याकडे धाव घेत ते मूल आईच्या कुशीत विसावले!

धायरी येथे राहणाऱ्या शाहीन सय्यद या त्यांच्या दोन वर्षांच्या मुलाला घेऊन नाना पेठेत त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आल्या होत्या. त्यांचा दोन वर्षांचा मुलगा घराबाहेर लहान मुलांसमवेत खेळत होता. थोड्या वेळाने तो चालत दुसरीकडे गेला, त्यानंतर त्याला त्याच्यासमवेत खेळणारी मुले आणि घरही आठवत नव्हते. त्यामुळे त्यांचा मुलगा रडत व आईला शोधत रस्त्याच्या कडेना जात होता. तेथून जाणाऱ्या एका महिलेने त्यास पाहिले. त्यानंतर तिनेस मुलाला घेऊन थेट समर्थ पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या नाना पेठ पोलिस चौकीत आणले. घडलेला सर्व प्रकारही पोलिसांना सांगितला.

त्यावेळी पोलिस कर्मचारी विजय कदम यांनी मुलाला बिस्कीट देऊन कसेबसे शांत केले. त्यानंतर कदम यांनी बाळाचा फोटो पोलिसांच्या व्हॉटस्‌अपग्रुपवर टाकून त्याचा शोध घेण्यास सुरूवात केली. त्यानंतर पोलिस कर्मचारी सूरज घनवट, नितीन दळवी यांनी मुलाच्या नातेवाईकांचा नाना पेठेतील मासळी आळी, भाजी मंडई, धान्य मार्केट, अशोक चौक येथे शोध घेतला. मात्र त्यांना मुलाचे पालक सापडले नाहीत. घनवट आणि दळवी गस्त घालत आणि मुलाचा शोध घेत असतानाच अल्पना चित्रपटगृहाजवळ एक महिला रडत असताना दिसली. त्यावेळी त्यांनी तिच्याकडे विचारपूस केली.

तेव्हा, तिने आपले दोन वर्षांचे मुल हरवले असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी महिलेस नाना पेठ पोलिस चौकीत आणले. तेव्हा, आईला पाहताच मुलाने तिच्याकडे धाव घेतली. आत्तापर्यंत रडत असणारे मुल क्षणार्धात हसतच आईच्या कुशीत विसावले. पोलिसांच्या या तत्परतेबद्दल सय्यद यांनी त्यांचे आभार मानले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Metro News: पुण्यातील भुयारी मेट्रो मार्गावर आता ‘रूट मार्कर’ बसणार; बोगद्याला मोठे छिद्र, नागरिकांना परवानगी घ्यावी लागणार!

Sikkim Tourism: सिक्कीममधील गुरुडोंगमार सरोवर पुन्हा खुले, पण नियम मोडल्यास प्रवास रद्द!

Satara News: साताऱ्यात स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांची परवड; गॅसटंचाईमुळे खाणावळी बंद, विद्यार्थी गावी परतल्याने अभ्यासिका ओस

IPL 2026 Marathi News: मुंबई इंडियन्स सहावे जेतेपद पटकावणार का? एक गोष्ट जी वाढवू शकते टेंशन, जाणून घ्या त्यांची बेस्ट Playing XI

Pune News: पुण्यातील बुधवार पेठेतील पोलिसांची अल्पवयीन मुलींवरील कारवाई बेकायदेशीर; तथ्यशोध समितीचा आरोप, बालहक्कांचे उल्लंघन!

SCROLL FOR NEXT