police 
पुणे

पोलिसांचा 'तो' व्हिडीओ अन् त्यामुळे पुण्यातील 'या' भागात...

सकाळवृत्तसेवा

कोथरुड : केळेवाडीत 35 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण झालेत त्यामुळे आम्ही केळेवाडी बंद करत आहोत, असे पोलिसांकडून सांगण्यात येत असल्याची व्हिडीओ क्लीप समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाली आहे. या क्लीपमुळे कोथरुडमधील नागरिकांमध्ये गैरसमज वाढला असून, केळेवाडीतील कामगार महिलांना कामावर येण्यास अनेक सोसायट्यांनी परवानगी नाकारली आहे.

वास्तविक पाहता कोथरुडमधील प्रभाग क्रं. 11 शीवतीर्थनगर, रामबाग कॉलनी मध्ये 11 तारखेपर्यंत 35 रुग्ण पॉझिटीव्ह सापडले आहेत. यातील 10 जण कोरोनामुक्त झाले असून, एक मृत आहे. प्रभाग अकरामध्ये सध्या 24 जण कोरोना पॉझि्टीव्ह आहेत.

वेळोवेळी समज देवूनही नागरीक ऐकत नाहीत. वस्तीत कोरोना वाढला तर सावरणे अवघड होईल यामुळे पोलिस प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहे. वस्ती जोडणारे रस्ते बंद करणे, विविध माध्यमाव्दारे जनजागृती करणे अशा उपाययोजना सुरु आहेत. त्यातच केळेवाडी मध्ये रुग्ण वाढले हे माझे अपयश आहे. आता तरी काळजी घ्या असे आवाहन करणारी क्लीप संपूर्ण पुणे शहरात पसरली. यातील पोलिसांचा हेतू चांगला असला तरी एकाच भागात एवढे रुग्ण सापडले असा समज झाल्याने, या वस्तीमधील कामगारांना कामावर येवू नका असे मालकांकडून सांगण्यात आले. नुकतेच कुठे काम सुरु झाले नाही तर तेही पुन्हा बंद झाल्याने महिलांमध्ये निराशेची भावना निर्माण झाली आहे.

सागर खळदकर-केळेवाडीत 35 रुग्ण सापडले असे सांगताना अख्ख्या प्रभागात आढळलेल्या आजवरच्या कोरोना रुग्णांची संख्या पोलिसांकडून जाहीर करण्यात आल्याने केळेवाडीतील कामगारांना कामाला मुकावे लागत आहे. पोलिसांचा हेतू चांगला असला तरी पध्दत चुकीची वापरल्याने नागरिकांच्या हिताला बाधा पोहचली आहे.

एसआरएच्या जागेतील वसंतनगर भागात अनाधिकृत झोपड्यांची संख्या वाढलेली आहे. आता या भागात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. या झोपड्यांवर कारवाई करुन तेथील जागा स्वच्छ करावी, वसंतनगर रेडझोन करावा अशी मागणी आम्ही केली आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केले तरच कोरोना रोखता येईल. -दिपक मानकर, नगरसेवक

कोथरुड पोलिस ठाण्याच्या वरीष्ठ पोलिस निरिक्षक प्रतिभा जोशी या मिटींगमध्ये असल्यामुळे फारशा बोलू शकल्या नाही. त्या म्हणाल्या की, केळेवाडी मधील भाग पत्रे घालून बंद केला आहे. वस्ती भागात कोरोनाचा शिरकाव वाढू नये म्हणून आम्ही उपाययोजना करत आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : विदर्भात उष्णतेची लाट तर या भागांत अवकाळी पाऊस लावणार हजेरी, आज तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान ? जाणून घ्या

पाणी मागणाऱ्या ६० वर्षीय वृद्ध महिलेला ‘मुले चोरणारी’ समजून मारहाण, नागपूरमधील धक्कादायक प्रकार...

Pune Accident: नवले पूलनंतर पुन्हा भीषण अपघात! जांभूळवाडीत ट्रक धडकून चालकाचा मृत्यू

Latest Marathi Live Update: सप्तशृंगी देवी ट्रस्टच्या विश्वस्त नियुक्तीला उच्च न्यायालयाची स्थगिती

Iran US Israel War : ‘होर्मुज’ला उत्तर ‘खार्ग’ने? बेट छोटं पण इराणच्या तेलसाम्राज्याचं हृदय... आता जगाला फटका बसणार?

SCROLL FOR NEXT