Nitin Gadkari : पुण्यातील चांदणी चौकात होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली वरीष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक पार पडली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत नितीन गडकरी यांनी काही महत्त्वाच्या योजनांबद्दल माहिती दिलीय यावेळी चाकण एमआयडीसी पासून 27 किमी अंतरावर असलेल्या पावलेवाडी येथे 180 हेक्टरात मल्टी मॉडेल लॉजेस्टिक पार्क उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.
पुणे शहराभोवती होणारा अभिर्भाव लक्षात घेता चाकण एमआयडीसीपासून 27 किमी अतरावर असणाऱ्या पावलेवाडी येथे 180 हेक्टरममध्ये हे लॉजेस्टिक पार्क उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यासाठी एमआयडीसीसोबत सामंजस्याचा करार देखील झाला आहे. हा प्रकल्प संयुक्तपणे राबवत असल्याचेही गडकरी यांनी यावेळी सांगितले.
पुणे विभागात लॉजिस्टिक पार्कसाठी जी जमीन अधिग्रहण करावे लागते. त्यासाठी NHAI तर्फे मी जिल्हाधिकाऱ्यांना एक ऑफर दिली आहे. त्यानुसार ठिकठिकाणी NHAI च्या बाजूला लॉजिस्टिक पार्कसाठी जर जागा दिल्यास मदत होणार आहे. केंद्रातर्फे दोन लाख कोटींच्या लॉजिस्टिक पार्कची निर्मिती केली जात आहे. त्यामुळे पुण्याजवळ अशा प्रकारची जागा मिळाल्यास ती या प्रकल्पांसाठी फायदेशीर ठरले असे गडकरींनी यावेळी सांगितले.
नाशिक फाट्यावर तीन मजली उड्डापुलाचं लक्ष
पुढे बोलताना गडकरी म्हणाली की, नाशिक फाटा येथे दोन मजली सहा पदरी रस्ता आणि तिसऱ्या मजल्यावर मेट्रो असा तीन मजली उड्डाण पूल करण्यासाठी विचार चालू आहे. पुणे विभागातील जमीन अधिग्रहणाच्या कामासाठी प्रशासनाने आणि मनपा अधिकाऱ्यांनी आम्हाला मदत करावी असं ते म्हणाले आहेत.
याबरोबर पुणे ते शिरूर आणि नगर, औरंगाबाद या जुन्या रोडवर तीन मजली रस्ताच्या डिझाईनचं काम चालू असल्याचेही गडकरींनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर तळेगाव ते शिरूर हा मार्ग विकसित करण्याचेही काम चालू आहे. त्यामुळे मुंबईकडून येणारे वाहने वळवता येणं शक्य होणार आहे. तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि पुणे-शिरूर-नगर या रस्त्याचेही आराखडे बनवण्याचं काम सुरू असल्याचे गडकरींनी यावेळी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.