Molestation Charges filed against husband of BJP party workers in pimpri 
पुणे

भाजप कार्यकर्तीच्या पतीवर विनयभंगाचा गुन्हा

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. यात भाजपच्या माजी पदाधिकारी महिलेने मारहाण केली; तर त्यांच्या पतीने एका महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना रविवारी (ता.8) दुपारी मासुळकर कॉलनीत घडली.

ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याबाबत 27वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार महिला भाजप कार्यकर्तीसह तिघांवर गुन्हा दाखल झाला. ही कार्यकर्ती आपल्या घराजवळ सीसीटीव्ही कॅमेरा बसवीत होत्या. त्या वेळी त्यांनी या कॅमेऱ्याचे तोंड शेजारीलघराकडे केले. त्यावर शेजाऱ्याने आक्षेप घेतला. यातून झालेल्या भांडणात भाजप कार्यकर्तीने त्या महिलेला मारहाण करीत ओरखडले; तर तिच्या पतीने फिर्यादी विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, भांडणे सोडविण्यासाठी आलेली फिर्यादीची आई व बहीण यांना कार्यकर्त्या महिलेने काठीने मारहाण केली. शेजाऱ्याच्या वडिलांना त्यांच्या सासऱ्याने मारहाण केली.

कोरोना भीती नको काळजी हवी!
भाजप कार्यकर्त्या महिलेनेही फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी पाइपने मारहाण केली. आपल्या चारित्र्याबाबत अश्‍लील शब्द वापरत शिवीगाळ केली. तसेच आरोपी हातोडी घेऊन मारहाण करण्यास धावून आले. दोन दिवसांत तुम्हाला कापून टाकतो, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, अर्धनग्नावस्थेतला VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT