Pune Rain Sakal Digital
पुणे

Pune Rain : परतीच्या पावसामुळे पुण्याची वाताहत का झाली?, पुढच्या दहा वर्षात अशी असेल परिस्थिती

वैष्णवी कारंजकर

रस्त्यावर पाण्याचे लोटच्या लोट वाहतायत, गाड्या वाहून जातायत, माणसांना धड चालताही येत नाही, वाहतूक ठप्प झालीय आणि आभाळ अगदी फाटल्यासारखं नुसतं कोसळतंय, विजांचा कानठळ्या बसवणारा गडगडाट होतोय, भयावह वाटावं असं अंधारून आलंय....गेल्या काही दिवसांमध्ये ही परिस्थिती वारंवार येऊ लागलीय. पावसाने अक्षरशः शहरांना, गावांना ओरबाडलंय. 'नको नको रे पावसा, असा धिंगाणा अवेळी', असं म्हणण्यापासून ते Rain Rain go away म्हणेपर्यंत प्रत्येक गोष्ट करून झाली, तरी हा पाऊस थांबायचं नाव घेत नाहीये. एवढं झालंय तरी काय? पावसाने आपला तिसरा डोळा का उघडलाय?

नुकताच पुण्यात प्रलयकारी पाऊस झाला. हा पाऊस पाहून पुणेकरांची अक्षरशः भंबेरी उडाली. फक्त पुण्यातच नव्हे, राज्यभरात विविध ठिकाणी पावसाने थैमान घातलं आहे. हा पाऊस परतीचा असल्याचं सांगितलं जातं, पण याची तीव्रता पावसाळ्यातल्या पावसापेक्षाही जास्त असल्याचं पाहायला मिळत आहे. दरवर्षी, वर्षानुवर्षे दुष्काळी म्हणवल्या जाणाऱ्या विदर्भ, मराठवाड्यानेही यंदा पूर पाहिला. सोयाबीन, कपाशी सारख्या पिकांची तर अक्षरशः नासाडी झाली. हा परतीचा पाऊस इतका आक्रमक कसा? याबद्दल तज्ज्ञांची काय मतं आहेत? या सगळ्याबद्दल थोडक्यात समजून घ्या या लेखाच्या माध्यमातून.

फक्त पुण्याचा सध्या विचार करुयात. पुण्यात २०१९ सालीही असाच प्रलयकारी पाऊस झाला होता. पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. आंबील ओढ्याकाठच्या घरांमध्ये पाणी गेलं होतं. हजारो जनावरं वाहून गेली, गाड्या वाहून गेल्या होत्या, परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. कालचा पाऊसही पुणेकरांना २०१९ चीच आठवण करून देणारा होता. त्यावेळी झालं तसा कोणता अनर्थ झाला नाही, तरी पावसाची तीव्रता मात्र तशीच होती. साधारणपणे मान्सून महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर येतो. जुलैपर्यंत संपूर्ण भारतात पसरलेल्या पावसाचा सप्टेंबरपासून परतीचा प्रवास सुरू होतो. नोव्हेंबरच्या शेवटापर्यंत संपूर्ण भारतातून पाऊस परत जातो.महाराष्ट्राचा विचार केला तर ऑक्टोबरच्या सुरुवातीच्याच आठवड्यामध्ये पाऊस जायला हवा होता. पण अजूनही हा पाऊस जायचं नाव घेत नाही.

काल भयावह पाऊस का झाला?

पुणे शहर आणि परिसरावर १२ किलोमीटर उंचीचा ढग रात्री असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम काश्यपी यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘हा ढग रात्री पुण्यावर जात होता. तो ज्या भागातून पुढे सरकला त्या भागात मुसळधार सरी पडल्या.’’ सकाळी उन्हाचा चटका वाढला. त्याच वेळी हवेतील बाष्पाचे प्रमाणही वाढले. त्यामुळे मोठ्या उंचीचे ढग शहर आणि परिसरात आले. त्यातून रात्री मुसळधार पाऊस पडला.

  • परतीचा पाऊस कसा पडतो?

    पाऊस जूनमध्ये भारतात येतो, त्यानंतर तो दिल्ली राजस्थानपर्यंत जातो आणि भारतभर पसरतो. नंतर जेव्हा हिंदी महासागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यावर हे वारे हिंदी महासागराकडे ओढले जातात आणि सप्टेंबर पासून त्यांचा उलट प्रवास चालू होतो. त्यालाच परतीचा पाऊस म्हणतात. सामान्य परिस्थितीत परत येणाऱ्या ढगांमध्ये कमी बाष्प असल्याने या पावसाचे प्रमाण कमी असते. खरंतर महाराष्ट्रात फक्त पंधरा टक्के पाऊस पडतो. काही लोक याला हवामान बदलाचा परिणाम म्हणतात तर काहींनी ऑस्ट्रेलियाकडे तयार झालेल्या ला-नीनो चा हा परिणाम असल्याचे अनुमान बांधले आहे.

पाणी तुंबणं आणि साचण्याचं कारण काय?

  • पाण्याचा निचरा न होऊ शकणं

    हे या मागचं प्रमुख कारण आहे. ओढे, नद्या यांच्यावर बांधलेले रस्ते, घातलेले बांध यामुळे पाण्याचा प्रवाह अडतो. परिणामी हा प्रवाह वाहण्यासाठी दुसरी जागा शोधू लागतो. त्यात पुण्यात आवश्यक तितके नालेही आता राहिलेले नाहीत.

  • नद्या, ओढे यांची मर्यादित केलेली पात्रं

    हे आणखी गंभीर कारण आहे. सातत्याने पडणारं पावसाचं पाणी साठवायचीही व्यवस्था नाही आणि निचरा होण्याचीही व्यवस्था नाही. अशा परिस्थितीत हे पाणी आपल्याला उपलब्ध नसलेली वाट शोधण्याचा प्रयत्न करतं. ज्यातून पूर, घरात पाणी शिरणे, पाणी तुंबणे, अशा प्रकारच्या घटना घडू लागतात. हे सगळं घडू नये म्हणून पाण्याचा निचरा, साठा होण्यासाठीचं योग्य नियोजन हा एकमेव उपाय आहे.

येत्या काळात पुण्यातला पाऊस आणखी जास्त वाढणार आहे. पर्यावरण विषयक कार्यकर्ते सारंग यादवडकर यांनी सांगितल्यानुसार पुण्यात २०३० पर्यंत पावसामध्ये ३२ टक्के वाढ होणार आहे. त्यामुळे आगामी काळात परिस्थिती आत्तापेक्षाही जास्त बिघडू शकते. तेव्हा ही केवळ एक धोक्याची घंटा आहे, असंच समजून तात्काळ उपाययोजना करणं भाग आहे. अन्यथा पुण्यात महापूर आल्यावाचून राहणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : काय चाललंय? धबधब्याखाली दोन मुले आक्षेपार्ह अवस्थेत, लोकांच्या माना लाजेने खाली, सार्वजनिक ठिकाण तरी सोडा रे...

Chakan MIDC : चाकण एमआयडीसी परिसरात वर्तुळाकार बससेवा, पीएमपी प्रशासनाचा निर्णय; अध्यक्षांकडून पाहणी

Vlogger of the Year: लोहार यांचा व्लॉगर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मान

Indrayani River : ‘इंद्रायणी-पवना सुधार’ निविदेसाठी सल्लागार, चार महिन्यांत कार्यवाहीनंतर काम सुरू होणार; ‘पीएमआरडीए’ची माहिती

Solapur: डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणी डॉ. उमा वळसंगकरांचा मनीषा मानेंविरुद्ध नवा अर्ज; आर्थिक अपहारप्रकरणी गुन्हा दाखल करा

SCROLL FOR NEXT